तप्त उन्हामध्ये घ्या जलतरणाचा आनंद

0
21

जळगाव : प्रतिनिधी

शहरातील जिल्हा क्रिडा संकुलातील जलतरण तलावाचे जिल्हा क्रिडा अधिकारी मिलींद दिक्षीत यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले.

सविस्तर वृत्त असे की,  कोरोना काळात बंद करण्यात आलेला जिल्हा क्रीडा संकुलातील जलतरण तलाव आज नागरिकांसाठी पुन्हा खुला करण्यात आला. जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित यांनी फीत कापून व नारळ वाढवून जलतरण तलावाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी गोविंद सोनवणे, विनोद कुलकर्णी, विजय माने, सागर सपके, नरेंद्र जाधव, शंकरराव निंबाळकर, प्रभाकर खर्चे, राजेंद्र सोनवणे, जगन जाधव, प्रशांत मांडोळे, गोविंद महाले यांचीही उपस्थिती होती.

यावेळी क्रिडा अधिकारी दिक्षीत यांचे स्वागत आरसी गृपचे राहुल सुर्यवंशी व चेतन महाले यांनी केले तर कार्यक्रम यशस्वितेसाठी ललित सुर्यवंशी, यादव महाले, बाळा सोनवणे, सुनिल चौधरी, विवेक चौधरी, रोहित वाघ यांनी कामकाज पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here