उरुळीकंचन ः प्रतिनिधी
मॅगेसेस ,पद्मश्री पुरस्कार विजेते डॉ मणीभाई देसाई यांनी ग्रामीण भागात ग्रामीणविकास,दुग्धोपादन,कृषी संशोधन तसेच शैक्षणिक क्षेत्रात महान कार्य केले.डॉ.मणीभाई राष्ट्रभक्तीने ओतप्रोत भरलेले होते.ते महान क्रतिविर ,जहाल मतवदी होते मात्र महात्मा गांधीजींच्या भेटीमुळे गांधीवादी बनले.विविध क्षेत्रात समर्पित भावनेने निष्काम कार्य करुन मूळचे गुजरातरत्न डॉ मणीभाई महाराष्ट्र रत्न बनले.पद्मश्री डॉ.मणीभाई देसाई म्हणजे गीतेतील ज्ञानयोग,भक्तियोग व निष्काम कर्मयोगाचे जातिवंत उदाहरण होते,असे मत ज्येष्ठ समाजसेवक डॉ.रविंद्र भोळे यांनी येथे व्यक्त केले.
अखेरचे गांधीजींचे शिष्य डॉ.मणीभाई देसाई ह्यांच्या एकशे दोनव्या जयंती निमित्ताने येथे डॉ मणीभाई देसाई मानव सेवा ट्रस्ट निती आयोग संलग्नीत दिल्लीवतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी डॉ.मणीभार्इंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
मार्गदर्शन करताना डॉ.रविंद्र भोळे पुढे म्हणाले की निसर्गोपचार व बायफ संस्थेची स्थपना करुन डॉ. मणीभार्इंनी ग्रामीण विकासाचे विविध प्रयोग साध्य केले.डॉ. मणीभार्इंची जयंती म्हणजे विभूती पुजा आहे,असे मत त्यांनी येथे व्यक्त केले.यावेळी समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याना सन्मानित करण्यात आले.
हवेली तालुका महानुभाव पंथाचे अध्यक्ष नंदकुमार मुरुकूटे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना डॉ.भोळे यांचे हस्ते गौरवण्यात आले.कार्यक्रमाला अमोल भोसले पत्रकार दै केसरी,सामजिक कार्यकर्ते नीलेश चौधरी,मिरेंद्र कांचन, संगीता भोळे, संचालक अस्मिता महिला नागरी पतसंस्था यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.