डॉ.पाकिजा पटेल ‘नेल्सन मंडेला’ आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

0
21

अमळनेर ः प्रतिनिधी
आदर्श गाव राजवड (ता.पारोळा) येथील मुख्याध्यापिका, समाजसेविका, शिक्षक नेत्या, महिला शिक्षक संघटना जिल्हाध्यक्षा डॉ.पाकीजा उस्मान पटेल यांना ‘होप इंटरनॅशनल अ‍ॅण्ड चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य’कडून ‘नेल्सन मंडेला इंटरनॅशनल पीस अवार्ड’ने सन्मानित करण्यात आले.
डॉ.पटेल या उपक्रमशील शिक्षिका असून सतत नवनवीन साधनांद्वारे अध्यापन करून विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून ज्ञान प्रबोधन करीत असतात. विद्यार्थी हितासाठी गेल्या २० वर्षापासून नेहमी रचनात्मक व सर्जनशील प्रयोग करीत असतात. ‘घरात शाळा आणि शाळेत घर’ हा उपक्रम राबवतात. विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर टिकावा यासाठी कसोशीने प्रयत्न करत असतात. आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने राजवड गावात आनंद व्यक्त करण्यात येत आहे. आपल्या संकल्पनेतून नवीन सुजान पिढ्यांचे निर्माण करण्याची क्षमता डॉ. पाकीजा पटेल करत आहे. त्यांनी केलेल्या कार्याचा ठसा आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटला आहे.
या यशाबद्दल आ.कृषिभूषण साहेबराव पाटील, जिजामाता कृषिभूषण नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, गटविकास अधिकारी एस.के.पाटील, गटशिक्षणाधिकारी कविता सुर्वे, शिक्षण विस्ताराधिकारी सी.एम.चौधरी, केंद्रप्रमुख भाईदास पारधी यांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here