जळगाव ः प्रतिनिधी
शहरातील सरदार वल्लभ भाई पटेल सभागृहात 1 मार्च रोजी आमदार राजुमामा भोळे व कलेक्टर अभिजित राऊत , महापौर जयश्रीताई महाजन, विष्णु भंगाळे, नगरसेवक डॉ.चंद्रशेखर पाटील, यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिराला भेट दिली. यावेळी 219 श्री सदस्यांनी रक्तदान केले. पद्मश्री डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाने आणि सचिनदादा धर्माधिकारी यांच्या प्रेरणेने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
नियमांचे पालन करा अन् मनातील भीती काढा
नियमांचे पालन करा आणि मनातील भीती दूर करा असे आवाहन मा,कलेक्टर अभिजित राऊत व राजुमामा भोळे शासकीय वैद्यकीय यांनी रक्तदान शिबीर प्रसंगी केले. या वेळी त्यांनी प्रतिष्ठानच्या नियोजन बद्ध कार्याचे कौतुक ही केले. जळगांव जिल्ह्यातील शासकीय रक्तपेढीमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवायला नको ही सामाजिक बांधीलकी जोपासत डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा ता अलिबाग जि रायगड याच्या मार्फत जळगांवमध्ये सरदार वल्लभभाई पटेल सभागृह या ठिकाणी रक्तदान शिबीर पार पडले. या रक्तदान शिबिरात 219 सदस्यांनी रक्तदान केले.
गरजेनुसार पुढील टप्प्यात रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येणार असल्याचे डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान वतीने सांगण्यात आले. सध्या काही वर्षे जगावर कोरोना संकट ओढवले
होते, त्यामुळे सर्वत्र कोरोना महामारी दरम्यान रक्तदानासाठी आवश्यक असलेल्या रुग्णांना रक्ताची कमतरता भासत आहे. अशा परिस्थितीमध्ये कोणत्याही रुग्णाला रक्ताची कमतरता भासू नये यासाठी रेवदंडा येथील डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान पुढे आले आहे. कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन करताना सामाजिक अंतर राखून तसेच सॅनिटायझरचा वापर करुन शिस्तबद्धपणे श्री सदस्यांनी रक्तदान केले.
याआधी प्रतिष्ठानमार्फत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या महाराष्ट्रातील विविध शिबिरांमधून 6 हजार 939 बॅग्ज आणि परदेशातील सिंगापूर येथील शिबिरातून 60 बॅग्ज रक्त संकलित करण्यात आल्या आहेत. गत काळात डॉ. श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने विविध समाजपयोगी कामे केली आहेत. त्यामध्ये वृक्षलागवड-संगोपन, स्वच्छता अभियान, जेष्ठ नागरिक दाखले वाटप, स्मशानभूमी, दफनभूमीची स्वच्छता, स्मशानभूीचे बांधकाम, विहीर पुनरभरण, आरोग्य शिबीर असे विविध कार्यक्रम घेण्यात आले आहेत. दरम्यान, जळगाव येथील प्रतिष्ठान च्या श्रीसदस्यांनी परिश्रम घेतले,