डॉ.उल्हास पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी लागली रिघ

0
30

जळगाव ः प्रतिनिधी

कर्मयोगी डॉ.उल्हास पाटील यांचा वाढदिवस हा गोदावरी परिवारासाठी मंगलपर्वणीच असतो. श्री संत गजानन महाराज यांचा प्रकटदिन आणि डॉ.उल्हास पाटील यांचा वाढदिवस म्हणजे दुग्धशर्करा योगच. शेगावनिवासी श्री संत गजानन महाराज यांच्या प्रतिमेचे माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यानंतर वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी हितचिंतकांसह स्नेहींची रिघ लागली. यावेळी डॉ.उल्हास पाटील यांच्यावर शुभेच्छांचा प्रचंड वर्षाव करण्यात आला.
चिमुकल्यांच्या
प्रेमाने भारावले
गोदावरी इंग्लिश मिडीयम स्कूल येथे 23 रोजी सकाळी डॉ.उल्हास पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी शाळेतल्या चिमुकल्यांनी दिलेले प्रेम पाहून अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील हे भारावले, यावेळी शाळा परिसरात वाढदिवसाचे औचित्याने हवन पूजन डॉ.उल्हास पाटील व डॉ.सौ.वर्षा पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी गोदावरी फाऊंडेशनच्या सदस्या डॉ.केतकी पाटील, डीएम कार्डियोलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील, स्कूलच्या प्राचार्य निलीमा चौधरी व शिक्षकवृंद उपस्थीत होते.
गोदावरी अभियांत्रिकीत रक्तदान
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात डॉ.उल्हास पाटील यांचे औक्षण करण्यात आले. तसेच लेझीम पथकाद्वारे स्वागत करण्यात आले. यात भव्य रांगोळीचे विशेष आकर्षण दिसून आले. यानंतर केक कटिंग समारंभ पार पडला, यावेळी गोदावरी फाऊंडेशनच्या सचिव डॉ.वर्षा पाटील, डॉ.केतकी पाटील, डॉ.वैभव पाटील, डॉ.अनिकेत पाटील व चिमुकली किवा पाटील हिची विशेष उपस्थीती होती. यावेळी डॉ.उल्हास पाटील, डॉ.केतकी पाटील व डॉ.अनिकेत पाटील यांच्याहस्ते फित कापून पोस्टर पेटिंग क्लासचे उद्घाटन करण्यात आले. तसेच रक्तदान शिबिरस्थळी दिपप्रज्वलन करण्यात आले. रक्तदान करताना रक्तपेढी समन्वयक लक्ष्मण पाटील, डॉ.नितीन भारंबे, टेक्निशियन सैय्यद शेख, नीता शिंदे, निखिल कुंभार, विक्की बागुल,व गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले व रक्तदान केले. 61 दात्यंनी यावेळी रक्तदान केले. याप्रसंगी गोदावरी अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.विजय पाटील, जीआयएमआरचे डॉ.प्रशांत वारके, विधी महाविद्यालयाचे ॲड.सतीश घाडगे आदि उपस्थीत होते.
याप्रसंगी हरिभाऊ जावळे इन्स्टीट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ॲण्ड केटरिंग टेक्नॉलॉजीचे प्रा.पुनीत बसन, उपप्राचार्य प्रविण फालक, रजिस्ट्रार इश्‍वर जाधव, प्रा.हेमंत इंगळे, ॲग्रीकल्चरचे प्राचार्य डॉ.सपकाळे, देवेंद्र मराठे, डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल भुसावळच्या प्राचार्य अनघा पाटील, सावदा स्कूलच्या प्राचार्य भारती महाजन, गोदावरी नर्सिंगचे संचालक शिवानंद बिरादर, रजिस्ट्रार प्रविण कोल्हे, प्रशासकीय अधिकारी आशिष भिरुड, आदिंनी शुभेच्छांचा वर्षाव केला. माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राजकीय वर्तुळातूनही सदिच्छा देण्यात आल्यात. भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांचे पुत्र सचिन चौधरी, काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी सदिच्छा दिल्यात. याशिवाय भ्रमणध्वनीद्वारेही शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. सर्वांचेच आवडते लोकप्रतिनिधी माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांना वाढदिवसानिमित्त सदिच्छा देण्यासाठी मुद्रित, दृकश्राव्य समुहातील माध्यम प्रतिनिधींनी देखील प्रत्यक्ष भेट घेत निरोगी दिर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्यात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here