‘डेहूळ’ व ‘महापात्रा’ ची बाजी की, ‘सोडी गेला बाबा’ आणि ‘वेगळं असं काहीतरी’ ची मुसंडी

0
32

महाराष्ट्र राज्य मराठी हौशी नाट्य स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात आठ नाटके सादर झालीत.या टप्प्याचे वैशिष्ट्ये म्हणजे मध्यप्रदेशातील इंदौरच्या नाट्यसंपदाने सादर केलेले ‘डेहूळ’ हे नाटक सर्वांगसुंदर झाल्याने सरस ठरल्याचे जाणवले.त्यामुळे या स्पर्धेत चुरस निर्माण झाली व
पहिल्या टप्प्यात चांगली नाटके सादर करणाऱ्या जळगाव शहरासह जिल्ह्यातील संस्थांना व हौशी कलावंतांना बरेच काही शिकायला देखील मिळाले.स्पर्धेत भाग घ्यायचा असेल तर नाट्य स्पर्धा जवळ आल्यानंतर तालीम करून केवळ चालणार नाही तर नाटकाचा ध्यास हा वर्षभर घ्यायला हवा व त्यादृष्टीने सातत्याने कार्यरत रहावे, असा संदेश जणूकाही या स्पर्धेने दिला.
दुसऱ्या टप्प्यात 28 फेब्रुवारी रोजी मु.जे. महाविद्यालयाच्या स्वायत्त विभागाने ब्लडी पेजेस,1 मार्च रोजी नाट्य भारती इंदूरचे श्रीराम जोग लिखित ‘डेहूळ’, ‘सेल,मोबाईल आणि’, 3 मार्च रोजी जवखेडे येथील समर्थ बहुउद्देशियचे ‘महापात्रा’, 4 मार्च रोजी सुबोध बहुउद्देशिय जळगावचे ‘बळी’, 5 मार्च रोजी उत्कर्ष कलाविष्कार संस्था भुसावळचे अनिल कोष्टी लिखित व दिग्दर्शित ‘सोडी गेला बाबा’, 7 मार्च रोजी व. वा. जिल्हा वाचनालय जळगावच्या ‘वेग्गळं असं काही तरी’ या डॉ. हेमंत कुलकर्णी लिखित व दिग्दर्शित नाटकाचा व 8 मार्च रोजी युवा ब्रिगेड फाउंडेशन जळगावच्या आकाश बाविस्कर लिखित व दिग्दर्शित ‘फक्त चहा’ या नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आले.
दुसऱ्या टप्प्यात ही स्पर्घा कमालीची चुरशीची ठरल्याचे दिसून आले त्यातल्या त्यात ब्लडी पेजेस, डेहूळ, महापात्रा, सेल-मोबाईल आणि…, सोडी गेला बाबा आणि वेगळं असं काहीतरी या नाटकांनी विशेष ठसा उमटविला.ही नाटके शर्यतीत असली तरी त्यात ‘डेहूळ’ व ‘महापात्रा’ बाजी मारतात की, ‘सोडी गेला बाबा’ आणि ‘वेगळं असं काहीतरी’ ही नाटके अचानक मुसंडी मारतात ,हे निकालानंतर स्पष्ट होईल.
अभिनयावर एक नजर टाकली तर ‘डेहुळ’ मधील श्रीराम जोग यांचा ‘वसु’भाव मारुन गेला तर ‘सोडी गेला बाबा’ मधील अनिल कोष्टी यांचा सरपंच खूपच उत्तम रंगला. सेल, मोबाईल आणि’ मधील हनुमान सुरवसे यांच्या आनंदने प्रेक्षकांवर विशेष ठसा उमटविला तसेच ‘ब्लडी पेजेस’ मधील सिध्दांत सोनवणे (मोरु) व दीपक महाजन (बटू) यांच्या भूमिकाही उल्लेखनीय. ‘बळी’ मधील प्रा.राज गुंगे यांचा ‘विठोबा’ रसिकांना भावला त्यामुळे त्यांच्यावर परीक्षक प्रसन्न झाल्यास नवल वाटू नये….वेगळं असं काहीतरी…या नाटकातील पद्मनाभ देशपांडे यांच्या सहज व कसदार अभिनयामुळे
‘नवरा’ रसिकांची मने काबीज केली खरी पण ते परीक्षकांची मने जिंकण्यात कितपत यशस्वी होतात,हे निकालानंतरच स्पष्ट होईल.
दुसऱ्या टप्प्यात स्त्री पात्रांमध्ये नेहा पवार हिने साकारलेली ‘महापात्रा’ लाजबाब ठरली व तिने प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवले.ती परीक्षकांच्या कसरतीत किती उतरते हे लवकरच समजेल.याशिवाय बळी मधील निशा पाटील यांची शेवंता,ब्लडी पेजेस मधील शुभांगी वाडीले यांची साजु,
…वेगळं असं काहीतरी… मधील मंजुषा भिडे यांची ‘मालू’ आणि ‘फक्त चहा’ मधील गायत्री ठाकूरची ‘प्रतिक्षा’ स्पर्धेत आहेत.त्यात कोणा- कोणाचा नंबर लागतो, याची उत्कंठा लवकरच संपणार
आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here