Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्रीडा»टीम इंडियाला पहिल्यांदा विंडीजविरुद्ध क्लीन स्वीपची संधी
    क्रीडा

    टीम इंडियाला पहिल्यांदा विंडीजविरुद्ध क्लीन स्वीपची संधी

    saimat teamBy saimat teamFebruary 11, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अहमदाबाद ः  वृत्तसंस्था । मालिका विजयाने फॉर्मात असलेल्या भारतीय संघाला आता विंंडीजविरुद्ध क्लीन स्वीपची संधी आहे. भारत आणि विंडीज यांच्यात आज शुक्रवारी मालिकेतील शेवटचा तिसरा वनडे सामना होणार आहे. सलगचे दोन सामने जिकूंन यजमान टीम इंडियाने मालिकेत 2-0 ने विजयी आघाडी घेतली आहे. पूर्ण वेळ कर्णधाराच्या भूमिकेेत रोहित शर्मानेे आपल्या नेतृत्वात टीम इंडियाला पहिला मालिका विजय मिळवून दिल आहे. आता घरच्या मैदानावर विंडीज टीमचा धुव्वा उडवण्याचा त्याचा मानस आहे. यासह त्याला आपल्या नेतृत्वात घवघवीत यशासह विक्रमाला गवसणी घालण्याची मोठी संधी आहे.
    भारतीय संघाने अद्याप मालिकेत विंडीज संघाला अद्याप क्लीन स्वीप दिले नाही.  भारताने 2019 मध्ये विंडीज दौऱ्यात तीन वनडे सामन्यांची मालिका 2-0 ने जिंकली होती. एक वनडे सामना पावसाच्या व्यत्ययामुळे होऊ शकला नाही.
    सूर्यकुमारचे स्थान मजबूत
    गत सामन्यात अर्धशतकी खेळी करून सूर्यकूमार यादवने (64) सर्वांचे लक्ष वेधले. तसेच संघाच्या विजयातही मोलाचे योगदान दिले. त्यामुळे त्याचे तिसऱ्या वनडेसाठी संघातील स्थान मजबूत आहे.
    दीपक हुडाला विश्रांती
    मालिकेत विजयी आघाडी घेेतल्यामुुळे आता कर्णधार रोहित शर्मा नवा प्रयोग साकारण्याची शक्यता आहे. यामध्ये रोहितकडून शिखर धवनला तिसऱ्या वनडेत खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. यातून तो पुनरागमन करू शकेल. धवनच्या सहभागाने उपकर्णधार लोकेश राहुल मधल्या फळीत फलंदाजीसाठी उतरू शकेल. धवनच्या पुनरागमनामुळे दीपक हुडाला विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे.
    भारतीय संघात आता तिसऱ्या वनडे सामन्यासाठी महत्त्वाचे तीन बदल होण्याची शक्यता आहे. यात गोलंदाज कुलदीप यादव वा रवी बिश्नोई यांच्यापैकी एकाला संधी मिळेल. यातून चहल किंवा वॉशिंग्टन सुंदरपैकी एकाला बाहेर बसावे लागेल. तसेच आवेश खानही संधीच्या प्रतीक्षेत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Bhusawal-Jamner : भुसावळ-जामनेर परिसरात धाडसी कारवाई; चोरीच्या तीन मोटारसायकलींसह दोन तरुण गजाआड

    January 30, 2026

    Indian cricketer : “रिंकू सिंहच्या रीलमुळे वादग्रस्त संघर्ष! देवतांचे चित्रण पोलीस तक्रारीत”

    January 19, 2026

    PM Narendra Modi : ‘विकसित भारताचे खरे शिल्पकार तरुणच’; VBYLD समारोपात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ठाम संदेश

    January 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.