
मुंबई ः प्रतिनिधी
ज्येष्ठ सिने पत्रकार अली पीटर जॉन यांचे काल बुधवारी निधन झाले. यानंतर चित्रपट क्षेत्रातून अभिनेते अनुपम खेर, अभिषेक बच्चन यांच्यासह अनेक दिग्गजांनी जॉन यांना श्रद्धांजली वाहिली. अनुपम खेर यांनी ट्वीट करत अली पीटर जॉन यांच्याविषयीच्या आपल्या आठवणींना वाट मोकळी करून दिली. त्यात अनुपम खेर यांनी जॉन यांना सिने पत्रकारीतेतील ‘दिलीप कुमार` म्हटले.
अनुपम खेर म्हणाले, “माझे जवळचे पत्रकार मित्र अली पीटर जॉन यांच्या निधनाची बातमी कळाल्यावर दुःख झाले. माझ्यासाठी अली पीटर1 जॉन सिने पत्रकारितेतील दिलीप कुमार होते. मी चित्रपटसृष्टीत येण्याआधीपासून त्यांच्या स्क्रीन मॅगेझीनमधील त्यांचा स्तंभ ‘अलीज नोट्स`चा चाहता होतो. ते पहिले पत्रकार होते ज्यांनी माझ्या मुंबईतील नाटकाविषयी लिहिलें”


