मलकापूर प्रतिनिधी
महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन व औरंगाबाद जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन च्या वतीने विभागीय क्रिडा संकुल गारखेडा औरंगाबाद येथे दि ३० जून ते २ जुलै दरम्यान आयोजित ज्युनिअर राज्यस्तरीय बॅडमिंटन अजिक्यपद स्पधेसाठी भाग घेनाऱ्या बुलढाणा जिल्हा संघाची जिल्हास्तरीय अजिक्यपद स्पर्धा आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्त साधुन बॅडमिंटन स्पोर्टस् असोशिएशन ऑफ बुलढाणा व विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२२ जुन पासुन जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले अहं. १३ व १९ वयोगटातील मुले-मुली यांच्या स्पर्धा दि. २२ जुन ला सिंगल व डबल्स अश्या स्पर्धा राहणार असून सदर जिल्हास्तरीय अजिक्यपद स्पधेतुन बुलढाणा जिल्हा संघाची निवड केली जाणार असून हा संघ महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन आयोजित औरंगाबाद येथील राज्य स्पधेत बुलढाणा जिल्हा संघाचे प्रतिनिधित्व करणार असल्याची माहिती बॅडमिंटन स्पोर्टस असोसिएशनचे संघटणेचे सचिव विजय पळसकर यांनी दिली.
सदर स्पर्धेतील खेळाडूंमधून प्रावीन्यप्राप्त खेळाडूंना राज्यस्तरीय स्पर्धेसाठी बुलढाणा जिल्हा संघ निवडला जाणार असल्याने खेळाडूंनी महाराष्ट्र बॅडमिंटन असोची ऑनलाईन नोंदणी करून घेणे आवश्यक राहील तसेच स्पर्धेसाठी संयोजक म्हणून संघटणेचे उपाध्यक्ष खिजर हयात खान हे तर आयोजन समिती प्रमुख प्रा.डाॅ. एच. ए.भोसले राहणार आहेत.
स्पर्धेच्या आयोजनासाठी विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डाॅ सुभाष बोबडे, गो.से.महाविद्यालयाचे तसेच बॅडमिंटन स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष राहुल संचेती , प्राचार्य डाॅ.धनंजय तळवळकर अनुराग बोबडे प्रा नितीन भुजबळ प्रा संजय वराडे आदिंनी शुभेच्छा दिल्या.