अमळनेर ः प्रतिनिधी
छत्रपती कृषी विज्ञान मंडळ संचलित गजानन माध्यमिक विद्यालय, राजवड (ता.पारोळा) या शाळेत ६ वर्षापासून कार्यरत इंग्रजी भाषेचे शिक्षक ज्ञानेश्वर पाटील यांना महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषद, जळगांव यांच्यावतीने सालाबादप्रमाणे बहाल केला जाणारा अत्यंत महत्वाचा ‘तात्यासाहेब महात्मा ज्योतीबा फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार’ २०२०-२१ या वर्षाकरीता घोषित करण्यात आला.
ज्ञानेश्वर पाटील यांनी तंत्रस्नेही शिक्षक म्हणून केलेले अध्यापन कार्य, विविध शैक्षणिक कार्यक्रमातील उत्साहपुर्ण सहभाग, विविध विषयावर लिहिलेल्या कविता व जनजागृती, कोरोना काळातील विद्यार्थ्यांना स्वःअध्ययनासाठी केलेली शैक्षणिक मदत तसेच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी आयोजित केलेली शिक्षकांसाठीची सक्तीची परीक्षा ‘शिक्षक पात्रता परीक्षा’ सतत पाच वेळा उत्तीर्ण होणे आदी उल्लेखनीय कार्य लक्षात घेता महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परीषद, जळगाव माध्यमिकचे राज्याध्यक्ष भरत शिरसाठ व प्राथमिकचे राज्याध्यक्ष सुर्यकांत गरुड यांनी ज्ञानेश्वर पाटील यांना यंदाचा ‘तात्यासाहेब महात्मा ज्योतीबा फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार’ महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधत आयोजित महात्मा फुले यांच्या जिवनावरील उद्बोधन कार्यक्रमात डॉ.राजेंद्र महाजन, ज्येष्ठ अधिव्याख्याता, डायट जळगाव, सुमित्रा अहिरे, शिक्षण विस्तार अधिकारी, चोपडा, सुवर्णा पवार, महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी, सांगली, धनराज मोतीराय, सेवानिवृत्त मुख्याध्यापक आर.टी.काबरे माध्यमिक विद्यालय, एरंडोल तसेच जिल्ह्यातील मान्यवर शिक्षक रणजित सोनवणे, गणेश बच्छाव, बी.एन.पाटील, प्रभावती बावस्कर, टी.बी.पांढरे, गोविंदा वंजारी, प्रमोद आठवले, छाया सोनवणे व इतर शिक्षक बंधु व भगिनी यांच्या ऑनलाईन बैठकीत घोषित केला.
हा पुरस्कार घोषित झाल्याने गजानन माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष तसेच अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे माजी आ. कृषीभूषण साहेबराव पाटील, उपाध्यक्षा व अमळनेर नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा जिजामाता कृषीभूषण पुष्पलता साहेबराव पाटील, सचिव लोटन देसले, मुख्याध्यापक योगेश सुर्यवंशी, सर्व शिक्षक बंधु व भगिनी, राजवड, दगडी सबगव्हाण, खेडीढोक ग्रामस्थ, मित्र परिवार व नातेवाईक यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला.