जळगाव ः प्रतिनिधी
जगातील ठिबक आणि तुषार सिंचनाचे संच उत्पादन करणाऱ्या दुसऱ्या क्रमांकाच्या व भारतातील प्रथम क्रमांकाची कंपनी जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडने संचालक मंडळाच्या बैठकीत आर्थिक वर्ष 2021-22 च्या चौथ्या तिमाही तसेच चालू आर्थिक वर्षाच्या लेखापरीक्षणापूर्वीच्या आर्थिक निकालास मंजुरी दिली.
कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक काल झाली. चौथ्या तिमाहीमध्ये एकत्रित उत्पन्नात 16.2 टक्के वाढ दर्शवली आहे. या आर्थिक वर्षात एकूण उत्पन्न 7119.5 कोटी रुपये आहे. जे गतवर्षी याच काळात केवळ 5666.9 कोटी रुपये होते.
व्यवसायात 25.6 टक्के वाढ
कंपनीच्या एकल व एकत्रित व्यवसायात 25.6 टक्के वाढ झाली. आणि कर व्याज व घसारा पूर्व नफा जवळजवळ शंभर टक्क्याने वाढला.तिसऱ्या तिमाहीच्या शेवटी आम्ही काही गोष्टींवर लक्ष केंद्रित करायचे ठरवले होते.चौथ्या तिमाहीत सगळ्याच व्यवसायांमध्ये समाधानकारक काम व सुधारणा झाली.
– अनिल जैन, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, जैन इरिगेशन