जैन इरिगेशनच्या आनंद पाटील यांना आंतरराष्ट्रीय चित्रकला  पुरस्कार

0
43

जळगाव : प्रतिनिधी
दुबई (यूएई) येथील अनिल केजरीवाल यांनी ‘आर्ट अॅण्ड क्राफ्ट’ मंच स्थापना केली. या मंच द्वारे “संकट मोचन” या विषय़ावर आंतरराष्ट्रीय स्तरावर मिनिएचर शैलीतील  चित्रकला स्पर्धा आयोजली होती. त्यात जगभरातून 200 हून अधिक कलाकृती प्रस्तुत झाल्या. त्यात जळगाव येथील जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे आर्टिस्ट आनंद पाटील यांच्या संकटमोचन मिनिएचर, मेवाड शैलीतील अत्यंत समर्पक, प्रसंगनिष्ठ चित्राची निवड परीक्षक मंडळाने केली. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्यांच्या चित्राची निवड होणे,  ही जळगावकरांना अभिमानाची बाब आहे.
संकटसमयी सर्वात जास्त श्री. हनुमानजींचे पूजन केले जाते. म्हणून त्यांना ‘संकट मोचन’ ही म्हटले जाते है। याचा अर्थ दु:ख, वेदना, संकटांना दूर करणारा असा होतो. स्वामी तुलसीदास यांनी म्हटले आहे कि, “को नहीं जनता है जग में, कपि, संकट मोचन नाम तिहारो।” म्हणजेच “हे हनुमान, तुमचे सर्व भक्त जाणून आहेत की, तुम्हीच भक्तांचे संकट दूर करू शकता.
सदर स्पर्धेत भारतासह फिलीपींस, अमेरिका, क्यूबा, नेपाल, पाकिस्तान असे 10 हून अधिक देशांतून कलाकारांनी आपल्या कला ऑनलाइन सादर केल्या.  सम्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रूपये दहा हजार असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
स्पर्धकांना हनुमान चालिसा किंवा रामचरितमानस या दोहोंपैकी कुठलीही एक चौपाई  वर आधारित श्री. हनुमानजींचे चित्र साकारण्यास सांगितले होते.  रामनवमीच्या औचित्याने या स्पर्धेतील विजेत्यांची नावे घोषित करण्यात आली.
या स्पर्धेसाठी तज्ज्ञ निवड समितीमध्ये पद्मश्री विजय शर्मा, प्रख्यात कलाकार नवल किशोर, प्रख्यात कलाकार धर्मेंद्र राठोड़, विजय धोरे,  सुकांत दास, कवयित्री श्रीमती रेखा गुप्ता, विजय आर जोशी आणि संयुक्त अरब अमीरात येथील खलीज टाइम्सचे वरिष्ठ पत्रकार अश्विनी कुमार या मान्यवरांचा समावेश होता. दुबई येथील स्टार ग्लोबल एलएलसीने हृदेश गुप्ता यांच्या पुढाकाराने प्रायोजकत्व स्वीकारले होते. विजेत्या स्पर्धकांना ऑनलाइन पद्धतीने प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे सन्मानचिन्ह व रोख रकम स्पर्धकांना यथावकाश पाठविण्यात येणार आहे.
आर्टिस्ट आनंद पाटील यांच्या या यशाबद्दल जैन  इरिगेशनचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांनी अभिनंदन केले. आनंद पाटील यांचे सहयोगी, मित्रमंडळी विकास मल्हारा, विजय जैन, राजू बाविस्कर, राजू साळी, युवराज लोधी, जितेंद्र सुरळकर, प्रदीप पवार, भोपाळचे निलेश चतुर्वेदी, नितीन सोनवणे, राजेंद्र महाजन, निरंजन शेलार, पुणे येथील विश्वकर्मा युनिर्व्हसिटीचे संचालक अवधूत अत्रे आणि मुंबईचे जॉन डगलस आदी कला रसिकांनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here