जेसीआय भुसावळ ताप्ती क्लब तर्फे जनजागृती अभियान

0
14

साईमत भुसावळ प्रतिनिधी

जेसीआय भुसावळ ताप्ती क्लब तर्फे शहरात जनजागृती अभियान राबवण्यात आले. शहरातील रिक्षांवर चार विषयावर बॅनर लावण्यात आले. भुसावळ शहरातील वीस रिक्षावर वेगवेगळी बॅनर लावण्यात आले.

बॅनरवर पाणी वाचवा पृथ्वी वाचवा, पाण्याची नासाडी थांबवावी, पाण्याचा वापर जपून करावा या साठी जन जागृती करण्यात आली. रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम बसवणे, खालवत चाललेली भूजल पातळी वाढविण्यासाठी प्रतेकांनी पावसाचे पाणी जमिनीत जीरवणे गरजेचे आहे.
सद्या पाऊस समाधानकारक होतोय हेच पावसाचे पाणी रेन वॉटर हा्वेस्टिंग सिस्टम आपापल्या घरात बसविले तर आपल्या गच्ची वरील पाणी आपल्याच बोरिंग मधे जीरेल व भूजल पातळी वाढविण्यास मदद होईल.

अन्नाची नासाडी थांवण्यासाठीचे बॅनर
बऱ्याच समारंभ, हॉटेल्स व घरात अन्नाची नासाडी केली जाते. अन्न पिकवायला अन्नदात्याला फार कस्ट सहन करावे लागतात, त्याच अन्नाची बऱ्याच ठिकाणी नासाडी केली जाते. बऱ्याच लोकांना दोन वेळेचे जेवण मिळणे कठीण असते, त्यात अशी नासाडी ही लाजीरवाणी बाब आहे म्हणून अण्णा ची नासाडी थांबवून गरजू लोकांना देणे व लोकांना जागृत करण्याची गरजच आहे.
सायबर सिक्योरीटी
आज सुशिक्षित लोक पण सायबर क्राईम च्या जाळ्यात अटकत आहे,बऱ्याच अनोळखी साईट वरून लोकांची फसवणूक होते,फेक कॉल किंवा मेसेज येताय. स्मार्ट फोन वापरतांना किंवा ऑनलाईन व्यवहार करतांना काय काळजी घ्यावी,फसवणूक झाल्या वर कुठे संपर्क करावा या संदर्भात जन जागृती करण्यात आली.
हा उपक्रम जेसीआयच्या अध्यक्षा रजनी सावकारे, सचिव जयश्री अग्रवाल, ज्योती दरगड, प्रिया छाबरा, रिया छाबरा, पल्लवी झोपे, रुचिता अग्रवाल, सुनीता अग्रवाल, सचिन अग्रवाल व सर्व रिक्षाचालकांच्या सहकार्याने पार पाडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here