जळगाव ः प्रतिनिधी
ओबीसी राजकीय आरक्षण हे सरकारच्या नाकर्तेपणामुळे घालवले गेल्याचा आरोप करत भाजपतर्फे सोमवारी आघाडी सरकारच्या विरोधात लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. याबाबत दुपारी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. दरम्यान, ओबीसी आरक्षण जरी लागू होणार नसले तरी आगामी निवडणुकीत ज्या जागा ओबीसीसाठी आहेत तेथे ओबीसी उमेदवार देणार असल्याची भूमिकेचा पक्षातर्फे पुनरुच्चार करण्यात आला.
ओबीसीप्रश्नी भाजपतर्फे आमदार राजूमामा भोळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी महानगराध्यक्ष दीपक सुर्यवंशी, भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ॲड. संजय महाजन, भरत महाजन, रमेश सोनवणे, भारती सोनवणे,जयेश भावसार,देवेंद्र पाटील, हेमराज कोरडे, गोपाळ भंगाळे,संजय भोळे आदी उपस्थित होते.
ओबीसीच उमेदवार देणार
ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न जरी मार्गी लागला नसला तरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ज्या जागा ओबीसीच्या आहे,त्या जागेवर ओबीसी उमेदवार उभे केले जातील या भाजपच्या भूमिकेचा यावेळी आमदार भोळे यांनी पुनरुच्चार केला.