साईमत सोयगाव प्रतिनिधी
येथील विश्वेश चौधरी यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जेजुरी पुणे येथे शासन आपल्या दारी कर्यांकर्मात नुकतेच प्रशस्तीपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले.
जेजुरी पुणे येथे शासन आपल्या दारी कार्यक्रमात बीव्हीजी इंडिया लिमिटेड कंपनीमध्ये कामाची संधी मिळाल्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री विजय शिवतारे यांच्या हस्ते सोयगाव येथील विश्वेश राजेंद्र चौधरी यांस प्रशस्तीपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले. ही संधी प्राप्त करुन देण्यासाठी रवींद्र घाटे, प्रमोद पवार यांनी विशेष परिश्रम घेतले.