जळगाव : प्रतिनिधी
जिल्ह्यातील उमर्टी परिसरातून शुक्रवारी पोलीस महानिरीक्षक यांच्या विशेष पथकाने चोपडा पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने केलेल्या कारवाईत पथकाने ५ गावठी कट्टे, १० जिवंत काडतुस, १ चारचाकी आणि २ मोबाईल तर २ जणांना अटक करण्यात आली असून दोघांनी पळ काढला आहे. असा ऐवज हस्तगत केला आहे.
सविस्तर वृत्त असे की, मध्यप्रदेश-महाराष्ट्र सीमेलगत असलेल्या उमर्टी भागातून जळगाव जिल्ह्यात नेहमी गावठी पिस्तूल आणि काडतुस आणले जातात. जिल्ह्यात त्याची विक्री करणारे मोठे रॅकेट सक्रिय आहे. काही महिन्यांपूर्वी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर यांनी पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांना मोहीम राबविण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार एक विशेष पथक देखील तयार करण्यात आले आहे.
शनिवारी चोपडा ग्रामीण पो.स्टे. च्या हद्दीत काही तरुण गावठी पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. चोपडा पोलिसांसोबत संयुक्त कारवाई करून छापा टाकला. पथकाने केलेल्या कारवाईत मयूर काशिनाथ वाकडे रा.अरुणनगर, चोपडा, अक्रम शेरखान पठाण रा.हरसूल, औरंगाबाद यांना अटक करण्यात आली आहे. तसेच अरुण नवनाथ सोनवणे रा.निगडी, पुणे व कट्टे देणारा लाखनसिंग मोहसिंग बरनालारा रा.उमर्टी याने पळ काढला.