जळगाव ः प्रतिनिधी
जिल्हा सहकारी दूध संघाच्या निवडणुकीच्या तयारीचा प्राथमिक टप्पा सुरू झालेला आहे. दूध संघाच्या मतदार संस्था असलेल्या 470 प्राथमिक दूध उत्पादक संस्थांमध्ये ठराव करण्यासाठी विशेष सभांचे आयोजन केले जात आहे. यासाठी सभासदांना सभेचा अजेंडा पाठवण्याची कार्यवाही सुरू झालेली आहे.
जिल्हा दूध संघाची निवडणूक 2015 मध्ये झाली होती. कोरोनामुळे मुदतवाढ मिळाल्यानंंतर या वर्षी ही निवडणूक होत आहे. संघासाठी एकूण 470 मतदार संस्थांकडून मतदान केले जाणार आहे. एकूण 21 संचालक निवडून देण्यासाठी ऑगस्ट महिन्यात संभाव्य मतदार होणार आहे.यासाठी सभासद संस्थांकडून मतदार निश्चित करण्यासाठी ठराव मागवण्यात आले आहेत. सहकार विभागाने सर्व सभासद संस्थांना पत्र देवून ठराव मागवले आहेत.
जूनच्या दुसऱ्या आठवड्यात येणार दूध संस्थांचे ठराव
प्राथमिक दूध संस्था संचालकांची बैठक बोलवून त्यांचे नावे ठराव करतील. हे ठराव 15 जूननंतर सहकार विभागाकडे प्राप्त होतील. त्यानंतर मतदार यादी तयारी केली जाणार आहे. या यादीवर हरकती आणि सुनावणी झाल्यानंतर अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.