जळगांव :प्रतिनिधी
जळगाव जिल्हा रायफल असोसिएशनची राष्ट्रीय खेळाडू व कोच कु. प्रियंका ओमप्रकाश पटाईत हिने स्पोर्टस ऑथॉरिटी ऑफ इंडियातर्फे झालेल्या प्रशिक्षक (कोच) प्रमाणपत्र प्रशिक्षण शिबीर यशस्वीपणे पूर्ण करून एस. ए. आय., एन.एस., एन. आय. एस. चे शुटींग या खेळाचे कोच प्रमाणपत्र पटकाविल्याबद्दल जळगाव जिल्हा रायफल असोसिएशनतर्फे क्रीडा प्रेमी हरिष मिलवाणी यांच्या हस्ते कु. प्रियंका पटाईत यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. त्यावेळी काशी मिलवाणी व असो.चे अध्यक्ष बिशनजी मिलवाणी, सचिव व मुख्य प्रशिक्षक दिलीप गवळी, प्रा.विनोद कोचुरे व सुनिल पालवे हे उपस्थित होते.