पाळधी ता धरणगाव : वार्ताहर
महाराष्ट्राचे पाणीपुरवठा व स्वछता मंत्री तथा पालकमंत्री जळगाव जिल्हा ना.गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बिलखेडा येथे भव्य आरोग्यशिबिर झाले. तसेच जांभोरा येथे गरजूंना रेशन कार्डचे वाटप करण्यात आले. पालकमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त आजपासूनच जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे.
ना.गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला हे भव्य रोगनिदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. सर्व आजारांवर मोफत उपचार व औषधे उपलब्ध करून देण्यात आले विशेषतः लहान मुलांसाठी विशेष बाल रोग तज्ञ डॉक्टर उपस्थित होते.
जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबराव पाटील यांनी या आरोग्य शिबिराचे कौतुक करताना सांगितले की, आरोग्य शिबिर अनेक होतात परंतु आरोग्य तपासणी सोबत औषधांचे वाटप होणारे पहिले आरोग्य शिबिर मी पाहिले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबराव पाटील हे उपस्थित होते. या शिबिरात डॉक्टर हेमंत पाटील बाल रोग तज्ञ डॉ. तुषार पाटील, डॉ. विशाल पाटील, डॉ. मनोज सोनवणे, दीपक पाटील आदी उपस्थित होते तसेच या शिबिरात मोफत रक्तगट तपासणीसुद्धा करण्यात आली.त्या कार्यक्रमाचे आयोजक बिलखेडा येथील माजी सरपंच डॉ.संदीप भास्कर बदाने यांच्यासह शिवसेना युवा सेना व ग्रामस्थ बिलखेडा मंडळी उपस्थित होती.
दरम्यान , तळागाळातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे हे वर्ल्ड व्हिजन इंडियाचे ध्येय आहे यासाठी वर्ल्ड व्हिजन इंडिया धरणगाव यांच्यामार्फत चार गावातील शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकवताना साहाय्य व्हावे यासाठी एज्युकेशनल किटचे वाटप करण्यात आले. यावेळी वर्ल्ड व्हिजन इंडिया धरणगाव चे अनिल बल्लुरकर – प्रकल्प अधिकारी अश्विनी रॉबर्ट, विजेश पवार, सुपरवायझर विजय राऊत, आरती पाटील, रचना जाधव उपस्थित होते. 23 गावात 42 रेमेडियल एज्युकेशन सेंटर सुरू आहेत. या 23 गावातील 42 सेंटर्स चे शिक्षकांना एज्युकेशनल कीट चे वितरण करण्यात आले तसेच या 42 सेंटर्स मधील 1290 मुलांना वह्या पुस्तके वितरण करण्यात आले.
तसेच ज्येष्ठ शिवसैनिक भदाणे गुरुजी, माजी सरपंच नवल रामचंद्र भदाणे, पोलीस पाटील किशोर भदाने, ग्रामपंचायत सदस्य बापू सर, बिलखेडा सरपंच चंद्रकांत काटे, ग्रामपंचायत सदस्य आखाडु, बाबुराव दिगंबर सोनवणे , दिलीप शांताराम भदाने, चंद्रकांत भदाणे, योगेश भदाणे यांच्यासह गावातील ज्येष्ठ नागरिक निंबा साहेबराव भदाने, धनराज भिकन भदाने, संभाजीराव भदाने, नरेंद्र पुंडलिक भदाने, तसेच युवासैनिक गोपाल नवल भदाने, पवन भदाने, आकाश भदाने, अनिल सोनवणे, शिवसेना शाखाप्रमुख शरद भालचंद्र भदाने, दिपक भदाने आदी उपस्थित होते.
गरजूंना रेशनकार्ड वाटप
जांभोरा येथे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गरजूंना जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबराव पाटील यांच्या हस्ते रेशनकार्ड वाटप करण्यात आले. याप्रसंगी शुभम चौहान, स्वप्निल परदेशी , वसंन गुजर, किशोर बोरसे, दीपक भदाने, अतुल पाटिल, सुरेश पाटिल गणेश पाटिल, सागर् गुजर इत्यादि समाधान महाजन उपस्थित होते.