जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील यांच्या कडून नुकसान झालेल्या भागांची पाहणी

0
69

जळगाव ग्रामीण प्रतिनिधी

 

जळगाव तालुक्यात वादळी वाऱ्यांमुळे केळी पीक उत्पादकांचे नुकसान झालेअसून जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील सकाळी 6 वाजेपासून नुकसानीची पाहणी करण्यासाठी निघाले.

काल संध्याकाळी 9 जून रोजी आलेल्या वादळी वाऱ्याने कापणीसाठी आलेले केळीचे पीक पार उद्ध्वस्त झाल्याने तालुक्यातील करंज, भोकर, भादली, पळसोद, किनोद, कठोरा, नंदगाव, देवगाव, गाढोदा आजूबाजूच्या परिसरातील शेतकरी संकटात सापडले आहे.
राज्यसभेचे खासदार निवडून देण्यासाठी निवडणूक असल्या कारणाने महाराष्ट्राचे पाणीपुरवठा व स्वछता मंत्री तथा पालकमंत्री जळगाव जिल्हा ना.गुलाबरावजी पाटील हे मतदान करण्यासाठी आज मुंबई येथे आहेत. त्यांच्या निर्देशानुसार जिप सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील हे मतदारसंघातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची व नागरिकांची भेट घेऊन सर्वोतोपरी मदत मिळवून देण्याचा दिलासा दिला.
मोठ्या प्रमाणात आलेल्या वादळी वाऱ्याने झाडे उन्मळून पडली. शेतात काढणीसाठी आलेल्या केळी पिकाचे झाड मुळासकट उन्मळून पडल्याने अवघ्या काही दिवसांवर कापणीसाठी आलेले हातचे पीक निसर्गाने हिरावून नेले. त्यामुळे आम्हा शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे शेतकरी भानुदास श्रावण पवार यांनी सांगितले.

शासनाने लवकरात लवकर या सर्व केळी उत्पादकांच्या शेताचा पंचनामा करून नुकसानभरपाई मिळावी यासाठी जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील सकाळी 6 वाजेपासून या परिसरात नुकसानीची पाहणी करत आहेत, भोकर येथे वृक्ष कोसळून सीताबाई आधार सोनवणे, शांताराम बाविस्कर, शंकर श्रीराम सोनवणे, यांच्यासह चार घरांचे व समाधान महारु सोनवणे यांच्या दुकानाचे नुकसान झाले. जीवितहानी झालेली नसली तरी ऐन पावसाळ्याच्या तोंडावर घरांचे नुकसान झाल्याने त्यांचे संसार विस्कळीत झालेले आहेत.

यावेळी जळगाव शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र चव्हाण, उपतालुका प्रमुख प्रमोद सोनवणे, विभाग प्रमुख गजानन विष्णू सोनवणे, उपविभागप्रमुख योगेश लाठी, ऍग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीचे विमा प्रतिनिधी पवार, करंज सरपंच अनिल सोनवणे, किनोद सरपंच प्रवीण पाटील, कठोरा डॉ सत्वशील पाटील, डॉ कमलाकर पाटील, किशोर पाटील, भोकर ग्राप सदस्य भोले बाबा, सुनील सोनवणे देवेन्द्र पाटील, संदीप पाटील, भरत हिंमत बोरसे, मुरलीधर पाटील, भोकर सरपंच अरुण सोनवणे, शरद पाटील, महसूल अधिकारी सर्कल दिनेश उगले, तलाठी भरत नन्नवरे, ग्रामसेवक चौधरी, परिसरातील शेतकरी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विकासो सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here