मुंबई : प्रतिनिधी
शिवसेना नेते संजय राऊतांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेत भाजप नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. सकाळपासून राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांचे धाडसत्र सुरू असताना राऊतांनी ही पत्रकार परिषद घेतलीय. यात संजय राऊतांनी अनेकांची नावं घेतली आहे. हे भ्रष्टाचाराचे आरोप करताना यात जितेंद्र नवलाणी हे नाव सर्वात महत्वाचे आहे, असा उल्लेख केला आहे. जितेंद्र चंद्रलाल नवलाणी असे या व्यक्तीचे संपूर्ण नाव राऊतांनी सांगितलं आहे. यात 60 कंपन्यांनी 100 पेक्षा जास्त लोकांकडून पैसे वसुल केलेत. या कॅश आणि चेक पेमेंटही आहे. डिजीटल ट्रान्सफरही आहे. ज्या कंपन्याची ईडीनं चौकशी केली. त्या कंपन्यांनी ईडीचा पैसा ट्रान्सफर केला. हा नवलाणी ईडीच्या मोठ्या अधिकाऱ्यांसाठी काम करतो, असा थेट आरोप राऊतांनी केला आहे.