साईमत बोदवड प्रतिनिधी
तालुक्यातील जामठी येथे भडगाव तालुक्यातील गोंडगाव या गावच्या घटनेच्या निषेधार्थ सोमवार सायंकाळी भव्य मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले. जामठी होडी मैदानापासून कॅन्डल मार्चची काढण्यात आले होते.
जामठी येथील गायत्री विष्णू मंदिराच्या प्रांगणापासून ते संपूर्ण गावभर हा मोर्चा काढण्यात आला होता. या मूकमोर्चा दरम्यान गावातील नागरिकांच्या हातामध्ये या घटनेच्या निषेधाचे फलक तसेच प्रत्येक नागरिकांच्या छाती वरती काळे रिबीन लावून घटनेचा निषेध करण्यात आला. दरम्यान सायंकाळी पाच वाजता या मूक मोर्चा ची सुरुवात करण्यात आली.या मूक मोर्चामध्ये गावातील महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.
दरम्यान मूक मोर्चात जामठी सरपंच शांताबाई पाटील, दिनेश कोठारी, भागवत तेली, विजय शर्मा , ईश्वर रतवेकर, इंदरचंद खिवसरा, विकास पाटील, सचिन महाजन, राजेंद्र शेळके, छायाबाई कोलते, संदीप महाजन ,अमोल पाटील, रेखा तेली, रंजना पाटील ,वंदना पाटील, पवन महाजन, जीवन पाटील ,प्रताप पाटील, विशाल ठाकूर, सीमा ठाकूर, भिका पाटील प्रमिला सुतार, असंख्य महिला उपस्थित होत्या .
कार्यक्रमाची सांगता गायत्री विष्णू मंदिराच्या प्रांगणातच करण्यात आली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. ईश्वर तेली यांच्याकडून करण्यात आले.