जळगाव : प्रतिनिधी
जळगाव जिल्हा महिला असोसिएशनतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त निशुल्क स्त्री रोग निदान शिबिराचे उद्घाटन प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर सुमन लोढा यांच्या हस्ते संपन्न झाला.प्रास्तविक अध्यक्ष राजकुमारी बाल्दी , कोषाध्यक्ष मिनाक्षी वाणी ह्यांनी पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत केले. हे शिबीर ८ मार्च ते १५ ऑगस्ट २०२२ पर्यंत असणार आहे.
प्रकल्प प्रमुख उपाध्यक्ष मंगला नगरकर यांनी शिबिरांची संपूर्ण माहिती दिली. हेमा रोकडे यांनी आभार मानले. प्रचार प्रमुख वैशाली पाटील, अ.भ.मारवाड़ी म.स.च्या महा प्र.उपाध्यक्ष आशाजी पगारिया, अ.भ.मा.म.स. जिल्हा सचिव ललिता श्रीश्रीमाळ , ,छाया गडे, राजकमल पाटील वंदना वानखेडे,डॉ. शेख इम्रान यांचे सहकार्य लाभले हे शिबिर पुर्णवर्ष गर्जून सांठी दर बुधवारी लोढा हॉस्पिटल जेडीसीसी बँक जवळ ,रिंग रोड येथे राबविले जाणार आहे. सकाळी साडे दहा वाजेपासून सायंकाळी ५पर्यंत सर्व किशोरी युवती महिलांसाठी खुले आहे सर्वांनी जास्ती जास्त या तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन जळगाव जिल्हा महिला असोसिएशन च्या वतीने करण्यात आले आहे.