जळगाव हादरले ; कासमवाडीत खून

0
9

जळगाव : प्रतिनिधी
शहरातील कासमवाडी परिसरात भरणार्‍या आठवडे बाजारातील मच्छी बाजाराच्या भागात आज पहाटे एका तरूणाचा मृतदेह आढळून आला. या तरूणाचा चेहरा दगडाने ठेचला असून याची ओळख पटविण्यात अडचण आली. काही वेळाने हा तरूण सागर वासुदेव पाटील ( वय सुमारे २६ वर्षे कासमवाडी ) येथील असल्याची माहिती मिळाली. हा तरुण जामिनावर सुटला असल्याचीही माहिती समोर येत आहे. ज्या ठिकाणी हा खून झाला या ठिकाणी दारूची बाटली पडलेली आढळून आली आहे.

या तरूणाला दगडाने ठेचून मारले असून याची माहिती मिळताच अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, सहायक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा, एमआयडीसेचे पोलीस निरिक्षक प्रताप शिकारे हे घटनास्थळी दाखल झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here