जळगाव : प्रतिनिधी
दिनांक 9 मार्च 2022 रोजी जळगाव शहर आम आदमी पार्टीची कार्यकारणी जाहीर करण्यात आली या बैठकीत आम आदमी पार्टीचे जळगाव जिल्हाअध्यक्ष तुषार निकम व जळगाव जिल्हा सचिव रईस खान तसेच जळगाव जिल्हा सल्लागार प्रमुख.डॉ.सुनीलजी गाजरे सर या मान्यवरांनी प्रमुख उपस्थिती दिली यावेळी जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या उत्साहात उपस्थित होते. कार्यकारणी पुढील प्रमाणे जळगाव महानगर कार्य अध्यक्षपदी.योगेश दत्तात्रेय हिवरकर. जळगाव शहर महानगर सचिव. चंदन दामू पाटील व जळगाव शहर महानगर मीडिया प्रमुख.योगेश चुडामन भोई यांची निवड करण्यात आली. या कार्यक्रमा प्रसंगीउपस्थित कार्यकर्ते.अनिल वाघ, आत्माराम चौधरी. प्रीतपाल सिंग, सुभाष कोळी, रवींद्र चव्हाण कार्यकर्ते उपस्थित होते.