भुसावळ : प्रतिनिधी
जळगांव रोडवरील रेल्वे उड्डाण पुलाजवळ मोटरसायकल चालकाने स्पीडब्रेकर समोर आल्याने अचानक ब्रेक लावल्याने मागून येणारी चारचाकी वाहन क्रमांक एम.एच 06 ए.एफ.6388 काळ्या रंगाची ह्या वाहनाचे चालकाकडून ब्रेक न लागल्याने मोटरसायकल चालकास वाचविण्यासाठी विजेच्या खांबाला धडक देऊन मोटरसायकल चालकाचे प्राण वाचविले या दरम्यान चारचाकी मधील चार प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहे. खांबाला वाहनांची धडक लागल्याने चारचाकी वाहनाचे अंदाजे एक लाख रुपये पर्यतचे नुकसान झाले आहे.घटनेची माहिती मिळताच वाहतूक शाखेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन वाहतूक नियंत्रणात आणून सुरळीतपणे सुरू केली.