साईमत जळगाव प्रतिनिधी
खनिज विकास निधी अंतर्गत व्याज स्वरूपात महाराष्ट्र राज्य खनि कर्म महामंडळ मर्यादित नागपूर यांच्याकडे उपलब्ध असलेल्या रकमेपैकी प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजने अंतर्गत प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष बाधित क्षेत्रातील जळगाव जिल्ह्यात विविध विकास कामांकरिता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह मंत्री द्वय व स्थानिक आमादारांच्या पाठपुराव्यामुळे 29 कोटी 87 लक्षच्या कामांना शासनाने नुकतीच प्रशासकीय व वित्तीय मान्यता दिलेली आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी बसण्याकरिता बेंचेस खरेदी करणे यासाठी ०५ कोटी रुपये तसेच त्या- त्या तालुक्यात साहित्यसह व्यायाम शाळा बांधकाम, गाव अंतर्गत काँक्रिटीकरण , पेव्हिंग ब्लॉक बसविणे, कॉंक्रीट गटार बांधकाम , सुशोभीकरण ,रस्त्यांची सुधारणा, लहान मोठ्या पुलांचे बांधकाम ,व शौचालय बांधकाम करणे या महत्त्वाच्या कामांचा समावेश आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये १ लीते ४ थी च्या १३ हजार ०२६ विद्यर्थ्याना तर ५ वी ते ८ वीच्या ३ हजार १७१ विद्यर्थ्याना असे एकूण १६ हजार १९७ बेंचेसची गरज आहे. याबाबत गांभीर्याने दखल घेत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्यक्ष /अप्रत्यक्ष खाण बाधित क्षेत्रातील विकास कामांसाठी महारष्ट्र खनिज विकास निधी अंतर्गत ५ कोटींचा निधी मंजूर केला असून यातून सुमारे ६ ते ७ हजार बेंचेस घेता येणार असल्याने शिक्षक व विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
यात जामनेर – वाडी किल्ला ते सामरोद रस्त्याची सुधारणा करणे ५ कोटी ,जळगाव व धरणगाव तालुक्यात गाव अंतर्गत काँक्रिटीकरण, शौचालय बांधकाम, साहित्यसह व्यायाम शाळा बांधकाम, सुशोभीकरण ई. कामांसाठी ७ कोटी २५ लक्ष , पाचोरा मतदार संघात लहान मोठ्या पुलांचे बांधकामा सह विविध विअकास कामासाठी ६ कोटी ३० लक्ष, मुक्ताईनगर व बोदवडसाठी १ कोटी, चोपडा मतदार संघासाठी १ कोटी ०२ लक्ष, एरंडोल तालुक्यातील कामांसाठी १ कोटी, चाळीसगाव मतदार संघात ४ कोटी व जि.प च्या विद्यार्थ्यांसाठी बेंचेस साठी ५ कोटी असा एकूण २९ कोटी ८७ लक्ष निधीस शासनाने प्रशासकीय व वित्तीय मान्यता दिली असल्याने जिल्ह्याच्या विकास कामांत भर पडली आहे.
