जळगाव : प्रतिनिधी
जळगाव जिल्हा अम्युचर मल्लखांब असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली यासभेत पुढील पाच वर्षांसाठी नूतन कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली. यात अध्यक्षपदी राजेश गोविंद जाधव, उपाध्यक्ष म्हणून प्रा.आशिषकुमार प्रभाकर चौधरी व जयंत श्रीकृष्ण जोशी (वरणगाव), कार्याध्यक्ष डॉ.प्रमोद रामदास चौधरी, सचिव किशोर माधवराव पाटील, सहसचिव नरेंद्र विश्वनाथ भोई (वरणगाव), खजिनदार सचिन लोटन सुर्यवंशी (धरणगाव), सल्लागार प्रा.संजय भिकाजी पवार (पारोळा), प्रवीण वसंतराव पाटील, सदस्य योगेश शशिकांत सोनवणे व सचिन सोपान चौधरी यांचा समावेश आहे. यांप्रसंगी शालेय राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत व विविध गटात राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत निवड झालेल्या खेळाडूंचे अभिनंदन करण्यात आले.
जिल्ह्यात मल्लखांब खेळाचा प्रचार व प्रसार करून प्रत्येक तालुक्यात मल्लखांब प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
नूतन कार्यकारीणीचे खासदार उन्मेष पाटील,माजी खासदार उल्हास पाटील, आमदार राजूमामा भोळे, आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे, विद्यापीठाचे क्रीडासंचालक डॉ.दिनेश पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दीक्षित, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघ फेडरेशनचे सचिव एस.डी. भिरुड सर, शिवछत्रपती पुरस्कार्थी डॉ.नारायण खडके व डॉ.प्रदिप तळवलकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य राधेश्याम कोगटा, क्रीडा मार्गदर्शक फारुख शेख, म.न.पा.क्रीडाधिकारी चंद्रकांत वांद्रे, जळगाव जिल्हा शिक्षकेत्तर संघाचे अध्यक्ष डिंगबर पाटील, जिल्हा शाररिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघाचे कार्याध्यक्ष प्रशांत कोल्हे, जिल्हा युवा शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघाचे अध्यक्ष डॉ.रणजित पाटील सचिव प्रा.हरिश शेळके यांनी अभिनंदन केले आहे.