जळगाव जनता सहकारी बँकेच्या पाचोरा शाखेत  २०२२ च्या दिनदर्शिकेचे लोकार्पण

0
6
पाचोरा : जळगाव दिनांक 12 : सभासदांसाठी विविध योजना राबविणाऱ्या जळगाव जनता सहकारी बँकेच्या वतीने दरवर्षी अतिशय माहितीपूर्ण अशा विविध सामाजिक विषयांवर आधारित दिनदर्शिकेचे वितरण करण्यात येते. यावर्षी बँकेच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या अनुषंगाने सन २०२२ च्या दिनदर्शिकेत देशाच्या इतिहासातील विविध घटना दिनदर्शिकेच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सन २०२२ च्या या दिनदर्शिकेत सार्वभौम राष्ट्राची पायाभरणी, एकराष्ट्र-एकजन-संस्थांनांचे विलीनीकरण, जन आंदोलने, सहकार चळवळ आणि बँकांचा विकास, विज्ञान आणि तंत्रज्ञान, सर्वशिक्षा अभियान, आत्मनिर्भर भारत, राष्ट्रीय सुरक्षा, वैभव संपन्न सिनेसृष्टी, तंत्रज्ञ पानाने समृध्द संस्था, साहित्य कला आणि संस्कृती, भारताची क्रीडा शक्ती या आपल्या देशाच्या विविध क्षेत्रांच्या माहितीचा समावेश दिनदर्शिकेत करण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे दिनदर्शिकेत सर्व शाखांचे फोन नंबर तसेच कार्यालयीन वेळेची माहिती, तिथी, वार, नक्षत्र इ.ची माहिती व केशवस्मृति समूहातील विविध प्रकल्पांची माहिती तसेच प्रकल्प प्रमुख, प्रकल्प सहप्रमुख व व्यवस्थापक व त्यांचे संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत. आज रोजी बँकेच्या पाचोरा शाखेत शाखेतील स्थानीक सल्लागार  अजय राजमल थेपडे प्रमोद ईश्वरलाल ललवाणी,प्रविण एकनाथ वाणी .गंगाराम दगडु तेली, व ग्राहक राजेंद्र मधुकर मराठे,श्री.दिपक अरविंद पाटील यांच्या शुभहस्ते कोरोनाच्या संदर्भातील शासनाचे सर्व नियम पाळून छोटेखानी कार्यक्रमात दिनदर्शिकेचे विमोचन संपन्न झाले व दिनदर्शिका वितरणास सुरुवात करण्यात आली. बँकेच्या सन्माननीय सभासद व ग्राहकांना दिनदर्शिका शाखेत कार्यालयीत वेळेत उपलब्ध होणार आहे असे शाखेच्या वतीने आव्हानं करण्यात  आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here