जळगावात दोन गट भिडले; तुफान दगडफेक ; ५ जखमी

0
16

जळगाव : प्रतिनिधी

गवळी वाडा परिसरात किरकोळ भांडणाच्या कारणावरून दोन गटात हाणामारी होवून  दगडफेक करण्यात आल्याची घटना रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली. यात ५ जखमी झाले असून त्याना रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीस पथक दाखल झाल्याने परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील तांबापुरा परिसरातील गवळीवाडा येथील मश्चिबाजार समोर मंगळवार रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास दोन जणांमध्ये किरकोळ वाद झाला. या वादातून दोघांनी एकमेकांच्या परिसरातील तरूणांना बोलावून घेतले. दोन्ही गट समोरासमोर आल्याने हाणामारी होवून तुफान दगडफेक करण्यात आली. यामध्ये स्थानिक रहिवाश्यांच्या घराचे नुकसान झाले आहे. जखमीना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
गवळीवाड्यात दगडफेक झाल्याची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेवून परिस्थिती आटोक्यात आणली आहे. घटनास्थळी पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे, सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे हे घटनास्थळी दाखल झाले आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा गवळीवाड्यासह परिसरात तणावपुर्ण शांतता असून दोन्ही गटातील संशयित आरोपींचे चौकशीचे काम पोलीस कर्मचारी करीत आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल होण्याचे काम सुरू होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here