जळगावात अल्पवयीन मुलगी गरोदर : सात जणांवर गुन्हा

0
28

जळगाव : प्रतिनिधी
मुलगी अल्पवयीन असून देखील तिचे लग्न लावून दिल्याने पतीने तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार समाेर आला आहे. या अत्याचारातून अल्पवयीन मुलगी तीन महिन्यांची गरोदर राहिली असून याप्रकरणी पतीसह लग्न लावून देणार्‍या ७ जणांविरूद्ध शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर असे की, जामनेर तालुक्यात राहणाऱ्या या १६ वर्षीय मुलीचे लग्न जून २०२१ मध्ये लावून देण्यात आले. यानंतर पतीने तीला जळगाव शहरात रहिवासाला आणले. तिच्यावर अत्याचार केले. चारीत्र्यावर संशय घेऊन तीला मारहाण केली. अत्याचारातून मुलगी गर्भवती राहिली आहे. पतीच्या त्रासाला कंटाळुन अखेर या मुलीने ८ फेब्रुवारी रोजी घरातून पळून जात थेट इंदूर (मध्यप्रदेश) गाठले. नातेवाइकांचे घर माहित नसल्याने तीला तेथेही भीती वाटू लागली. या मुलीने अखेर इंदूर पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी तीला महिला व बालकल्याण समितीसमोर हजर केले. तेथे मुलीने आपबीती सांगीतली. यानंतर इंदूर पोलिसांनी मुलीस शनिपेठ पोलिस ठाण्यात आणले. या प्रकरणी स्वत: मुलीने दिलेल्या फिर्यादीवरुन तीची आई, पती व इतर जवळच्या सात नातेवाइकांच्या विरुद्ध शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक बळीराम हिरे तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here