जळगाव : प्रतिनिधी
शहरातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना गुरुवार 17 मार्चपासून कोर्बेव्हॅक्स लस दिली जाणार आहे. आज सकाळी शहरातील शाहू महाराज रुग्णालयात पहिली लस देऊन प्रारंभ करण्यात आला. बुधवारी राज्य शासनाकडून कोर्बेव्हॅक्स लस मनपाला प्राप्त झाली. 1 जानेवारी 2008 ते 17 मार्च 2010 दरम्यान जन्मलेल्या मुले/मुलींना ही लस देण्यात येईल. यासाठी त्यांना आपले आधार कार्ड किंवा जन्मतारीख नोंद असलेले शाळेचे ओळखपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे. आरोग्य सेतू ॲपवर नोंदणी करून किंवा ऑन स्पॉट नोंदणी करण्याची मुभा राहील. लस घेण्यासाठी मुलांचे 12 वर्ष पूर्ण होणे आवश्यक आहे. केंद्र शासनाकडून मान्यताप्राप्त कोर्बेव्हॅक्स लसीचे दोन डोस दिले जातील. पहिला डोस घेतल्यानंतर दुसऱ्या डोससाठी 4 आठवड्यांचे अंतर असणे आवश्यक आहे.
प्रत्येक तालुक्यात दोन केंद्र
जळगाव जिल्हास्तरावर सोमवारी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने लसीकरणासाठी सर्व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले. तसेच बुधवारी देखील आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक तालुक्यात दोन लसीकरण केंद्र असणार आहे.