जळगाव : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य स्थापत्य अभियांत्रिकी संघटनेचे जिल्हाध्यक्ष व मराठासेवा संघाचे जळगांव महानगराध्यक्ष,जलसंपदाचे शाखा अभियंता शिवश्री एच् एच् चव्हाण यांना लघु पाटबंधारे सर्व्हेक्षण ऊपविभाग जळगांव च्या वतीने ३७ वर्षाच्या इमानेइतबारे प्रदिर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले त्यांना ऊपविभागाच्या वतीने एका कार्यक्रमात प्रेमाचा निरोप देण्यात आला.ऊपविभागिय अभियंता सौ.आरती सुर्यवंशी मॕडम यांचे हस्ते सपत्निक श्री व सौ चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी ऊपविभागिय अभियंता सौ आरती सुर्यवंशी मॕडम, मराठा सेवा संघाचे महानगर सचिव शिवश्री चंद्रकांत देसले ,ऊपाध्यक्ष शिवश्री सचिन पाटील,शाखा अभियंता शिवश्री अशोक देवराज,शिवश्री ऊमेश सपकाळे,व महाराष्ट्र राज्य स्थापत्य अभियांत्रिकी संघटनेचे राज्य अध्यक्ष शिवश्री एन टी आढे,यांनी शिवश्री एच् एच् चव्हाण यांच्या अभ्यासात्मक, संघटनत्मक व सेवाभावी कार्याचा गौरव केला. कर्मचारी-अधिकारी यांच्यावरील अन्यायाविरुध्द लढा देणारे झुंजार व सेवाभावी व्यक्तिमत्व असल्याचे नमुद केले.सत्काराला ऊत्तर देतांना शिवश्री इंजि चव्हाण म्हणाले कि- संघटनेच्या माध्यमातून कर्मचारी-अधिकारी यांच्या न्यायासाठी सतत संघर्ष केला.व विभागात शेतकरी केंद्रस्थानी मानून जनताजनार्दनाची सेवा केली.यामुळे जेथे जावे तेथे आदर मिळतो हिच खरी कमाई असल्याचे म्हणाले.कार्यक्रमास कडाचे अधिक्षक शिवश्री पी एल पाटील रावसो,मराठासेवा संघाचे महानगर सचिव शिवश्री चंद्रकांत देसले,ऊपाध्यक्ष शिवश्री सचिन पाटील,शिवश्री अमित पाटील,शिवश्री संदिप पवार,शिवश्री ज्ञानेश्वर साळूंखे,शिवश्री विजय शिंदे, महानगर कार्याध्यक्ष शिवश्री सचिन पवार उपस्थित होते.जळगांव पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधिक्षक अभियंता शिवश्री वाय् के भदाणे साहेब व माजी माहिती आयुक्त इंजि शिवश्री व्हि डी पाटील साहेब,कार्यकारी अभियंता सौ व्हि टी ठाकरे मॕडम व सामाजिक राजकिय प्रशासकिय क्षेत्रातील मान्यवरांनी व तापी पाटबंधारे महामंडळाचे सर्व अधिकारी कर्मचारी यांनी शाखा अभियंता शिवश्री इंजि एच् एच् चव्हाण यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.कार्यक्रमाचे ऊत्कृष्ट सुत्रसंचालन व आभार सहाय्यक अभियंता श्रेणी-२ कु.तेजस्विनी शिंदे यांनी केले.कार्यक्रम यशस्वितेसाठी शाखा अभियंता शिवश्री क्षितीज चौधरी,शिवश्री ऊमेश सपकाळे,व सौ जयश्री भोईटे मॕडम यांनी परिश्रम घेतले . (????प्रति,-मा.संपादक सो.कृपया आपल्या लोकप्रिय दैनिकातून व व्हाटसअप यु ट्युब चॕनलवरुन सदरचे वृत्त सविस्तर प्रकाशित करणेसाठी नम्र विनंती करीत आहे. विनित-शिवश्री एच् एच् चव्हाण जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य स्थापत्य अभियांत्रिकी संघटना तथा महानगराध्यक्ष मराठासेवा संघ जि-जळगांव )