बोदवड, प्रतिनिधी – बोदवड येथील न्यायालयात शनिवारी फिरत्या लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी जलद न्यायासाठीच लोकअदालतीचा गरजुंनी लाभ घ्यावा असे अवाहन न्या.सरवरी यांनी केले. बोदवड येथील न्यायालयात फिरत्या लोक अदालतीचे तसेच मोफत कायदेविषयक सल्ला शिबीर घेण्यात आले. न्यायधीश क्यू.ए.एन.सरवरी अध्यक्षस्थानी होते. फिरत्या लोक अदालतीत एकुण १६ प्रकरणी तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. १६ फौजदारी प्रकरणांत तडजोड झाली.
व्यासपीठावर बोदवड तालुका वकील संघाचे अध्यक्ष व पंच म्हणुन ॲड.अर्जुन पाटील, ॲड.धनराज प्रजापति उपस्थित होते. सदर कार्यक्रमास मोठया प्रमाणावर पक्षकार, व्यापारी वर्ग उपस्थित होते. फिरत्या न्यायालयामाफर्त पक्षकाराच्या केसेसचा ताबडतोबनिपटरा झाल्यामुळे पक्षकारानी समाधान व्यक्त केले तसेच सदर कार्यक्रमास यशस्वितेसाठी ॲड. के.एस.इंगळे, ॲड. व्हि.के शर्मा, ॲड.व्हि.पी.मगंळकर, ॲड. संतोष कलंत्री, ॲड.निलेश लढे, ॲड.मिनल अग्रवाल, ॲड. तेजस्विनी काटकर, ॲड. अमोल परदेशी, व बोदवड तालुक वकील संघाचे सदस्य उपस्थित होते. सदर कार्यक्रम न्यायालीयन अधीक्षक एस.पी.आठवले नाना, एस.एस.परसे, संजय मानकर, भिका सोनवणे, परमेश्वर जाधव, प्रशांत कुमार बेदरकर, नंदकिशोर धनगर, भगवान पाटील, बोदवड तालुका वकील संघ, न्यायालयीन कर्मचारी वर्ग व बिलीफ, पोलिस कर्मचारी एस.डी.महाजन यांनी उपस्थिती देवुन कार्यक्रम यशस्वितेसाठी परिश्रम केले.
फोटो- फिरत्या लोक न्यायालयात न्या. सरवरी व पंच ॲड.अर्जुन पाटील, ॲड.धनराज प्रजापति.
विनीत- बोदवड तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड.अर्जुन पाटील.