साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
मराठा आरक्षणासाठी लढणारे नेते मनोज जरांगे-पाटील यांच्या चाळीसगाव येथील विराट सभेसाठी येताना बऱ्याच चांगल्या गोष्टी दिसल्या. जरांगे पाटील यांच्या लढ्याला यश मिळावे, यासाठी सर्व समाजाने एकत्र येत स्वागत केले.
शहरातील हॉटेल सदानंद जवळील त्यांचे जल्लोषमय झालेले स्वागत. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकावर जाऊन अभिवादन त्याठिकाणी बौद्ध समाजाचे लोकांनी एकत्र येत जरांगे पाटील यांचे स्वागत केले. पुढे अँग्लो उर्दू शाळेजवळ मुस्लिम संघटना व नेत्यांनी स्वागत केले. देशमुख, राजपूत, बंजारा व सकल मराठा समाज यांनी फटाक्यांची आतिषबाजी केली. हजारोच्या संख्येने नागरिकांनी सभेला गर्दी केली. कॉलेजजवळ नगरसेवक भगवान पाटील यांनी श्रोते व कार्यकर्ते यांच्यासाठी नाश्त्यासह पाण्याची केलेली सोय.अशा अनेक चांगल्या गोष्टी व सामाजिक सलोखा आबादीत राहील, असे उदाहरणेही अनुभवायला आले.