Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»जरंडी शिवार बिबट्या मृत्यू प्रकरण… 48 तासात वनविभागाने आरोपीचा लावला छडा
    क्राईम

    जरंडी शिवार बिबट्या मृत्यू प्रकरण… 48 तासात वनविभागाने आरोपीचा लावला छडा

    SaimatBy SaimatFebruary 28, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी

    सोयगाव वनपरिक्षेत्रातील मौजे जरंडी याठिकाणी दिनांक 23/02/2022 व 24/02/2022 रोजी आढळलेल्या वन्यप्राणी बिबट्याचा मृत्यू झाला. सदर घटनेच्या आरोपीच्या शोधासाठी लगेचच वनविभागाने चक्रे फिरवली व दिनांक 27/02/2022 रोजी एका आरोपीस अटक करून त्यास मा. न्यायालय सोयगाव याठिकाणी हजर केले. मा. न्यायालयाने आरोपीला दिनांक 2/3/2022 पर्यंत तीन दिवसांची वनकोठडी सुनावली आहे. त्यामुळे अवैध शिकार करणाऱ्याचे चांगलेच धाबे दणाणले आहे.

    जरंडी शिवारात आढळलेल्या दोन्ही बिबट्याचा विषबाधेतून मृत्यू झाला असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यादिशेने वनविभागाने आपला मोर्चा वळविला असून एका आरोपीस दिनांक 27/02/2022 रोजी अटक करण्यात आली व तपासातून योग्य दिशेने वाटचाल होत असल्याचे सूत्रांनी सांगितले. सदर प्रकरण वनविभागाने युद्धपातळीवर घेतले असून लवकरच याचे सूत्रधार गजाआड होतील अशा तीव्र हालचाली सुरू आहेत.

    मादी बिबट्याचा जीव वाचविण्याचा वनविभागाने केली जिवतोड मेहनत
    दिनांक 24/02/2022 रोजी मरणासन्न अवस्थेत आढळलेल्या बिबट्यास वनविभागाने तातडीने सोयगाव येथे हलवून तीन तज्ञ डॉक्टरांना पाचारण केले, औरंगाबाद, जळगाव येथून औषधे उपलब्ध केली, ऑक्सिजन सिलेंडर, तातडीने हलविण्यासाठी मोबाईल व्हॅन, आवश्यक संसाधने इ डॉक्टरांना उपलब्ध करून दिले. डॉक्टरांनी देखील जीवाचे रान करून सदरील बिबट्याचा जीव वाचविण्याचा प्रयत्न केला परंतु त्यास यश आले नाही व अखेर बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यामुळे वनविभाग व डॉक्टरांनी अतिशय हळहळ व्यक्त केली. त्याचाच वचपा आज वनविभागाने काढला.

    48 तासातच लावला आरोपींचा छडा.
    दोन बिबट्याच्या मृत्यूचे घाव वनाधिकाऱ्यांच्या काळजावर कोरल्या गेल्यामुळे वनविभागाने वेगवान चक्रे फिरवून 48 तासातच
    आरोपींचा शोध लावून त्यास अटक करून ताब्यात घेतले.

    खवले मांजर व रानडुक्कर अवैध शिकार प्रकरणातही वनविभागाची दमदार कामगिरी

    ऑगस्ट महिन्यात अतिशय दुर्मिळ खवले मांजर व रानडुक्कर प्रकरणी वनविभागानेअनुक्रमे 4 व 7 आरोपींना अटक करून त्याची हर्सूल जेल मधे रवानगी केली होती. त्यामुळे वनविभागाने वन्यजीव संरक्षणात केलेल्या सततच्या धडक कारवायांमुळे जवळपास सर्वच प्रकारच्या अवैध कृत्यास छाप बसला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Varangaon:वरणगावात वृद्धावर लोखंडी रॉडने धोकादायक हल्ला

    March 13, 2026

    Malkapur:मलकापूरमधील सर्पमित्राचा दुर्दैवी अंत

    March 13, 2026

    Jalgaon : भारत मुक्ती मोर्चा जळगावात शांततामय पण ठाम आंदोलन

    March 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.