जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी घोसला ग्रामपंचायत पुढे सरसावली…..व्यवस्था पाण्याची………

0
65

विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी

उन्हाच्या तडाख्याने लाही लाही झालेल्या जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची चक्क ग्रामपंचायतीने दखल घेत गावालगत असलेला पाण्याचा हौदाला पाईपलाईन करून पाण्याने हौद भरून ठेवून जनावरांच्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी घोसला ग्रामपंचायतीने एक पावूल उचलले आहे.यासाठी सरपंच सुवर्नाबाई वाघ,उपसरपंच सुभाष बावस्कर,यांनी पुढाकार घेतला आहे.ग्रामस्थांनी यासाठी परिश्रम घेवून एकाच रात्रीतून या हौदाला जोडणी करणारी पाईपलाईन जोडली आहे.त्यामुळे घोसला परिसरातील जनावरांच्या घशाची कोरड आता दूर झाली आहे.

घोसला गावालगत असलेल्या हौदात ग्रामपंचायतीने पाणी जोडणी करून जनावरांच्या घशाची तहान दूर केली आहे.सध्या परिसरात पाण्याची टंचाई जाणवत असतांना जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला असल्याने घोसला ग्राम पंचायतीने मात्र जनावरे आणि पशुपक्षांना पिण्याच्या पाण्यासाठीची वणवण थांबवून गावाच्या जवळच असलेल्या हौदाला पाण्याची जोडणी केली आहे.याकामी ग्राम पंचायत सदस्य पवित्राबाई युवरे,प्रतिभा गुणवंत पाटील,अलकाबाई बावस्कर,प्रतिभा गवळी,सतीश सोनवणे,सोमू तडवी,गणेश माळी या ग्राम पंचायत सदस्यांच्या कल्पकतेतून हा उपक्रम राबविण्यात आला यासाठी भाऊसाहेब भालेराव,दोधू पाटील,चरण वाघ,अनिल तडवी,हेमंत गव्हांडे,निवृत्ती सोनार,आदींनी पुढाकार घेतला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here