साईमत रावेर प्रतिनिधी
महसूल प्रशासन मागील आठवडाभरा पासुन राबवत असलेला ‘महसूल सप्ताह’ मध्ये अनेक लाभार्थांना ई-पिक वेग-वेगळे शासकीय दाखले गरीब निराधार लोकांना दिलेल्या लाभ शेतकऱ्यांसाठी केलेल कामे, यासह अनेक जनहिताच्या योजना सर्वसामान्य जनते पर्यंत पोहचवीणे हेच महसूल विभागाचे उद्दिष्ट असल्याचे मत प्रांतधिकारी कैलास कडलक यांनी व्यक्त केली.
आठवडाभरापासून सुरु असलेला महसूल सप्ताहचा समारोप रावेर शहरातील कमलाबाई गर्ल्स हायस्कूलच्या जिमखाना हॉल करण्यात आला, त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख उपस्थिती आयएएस अधिकारी अर्पित चव्हाण होते.
यावेळी प्रास्ताविक करतांना बंडू कापसे म्हणाले की, रावेर तालुक्यातील गरीब व शेतकरी कुटुंबाच्या हीताचे काम करणे महसूल विभागाच्या जास्तीत-जास्त योजना त्यांच्यापर्यंत पोहचवणे हीच महसूल विभागाचे खरे ध्येय आहे. पुढे देखिल आमच्याकडे समस्या घेऊन आलेल्या सर्वसाधारण जनतेचे तात्काळ निवारण केले जाणार असल्याचे श्री कापसे यांनी सांगितले. प्रसंगी वेग-वेगळ्या योजनेचा लाभ घेणा-या लाभार्थांना प्रमाणपत्र उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी परीविक्षाधीन तहसिलदार मयूर कळसे, भाजपा जिल्हाउपाध्यक्ष पद्माकर महाजन, गट विकास अधिकारी मंजुश्री गायकवाड, रावेर मुख्यधिकारी स्वालिहा मालगावे सावदा मुख्यधिकारी किशोर चव्हाण, कृषी अधिकारी एल.ए.पाटील,सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागाचे श्री चौधरी, व्हि. के. तायडे, निवासी नायब तहसिलदार सजंय तायडे, सहायक पोलिस निरीक्षक सिध्देश्वर आखेगावकर, डॉ दत्तप्रसाद दलाल दिपक गवई, तलाठी मंडळ अधिकारी पोलिस पाटील आदी उपस्थित होते.