जंगलास आग लागू नये म्हणून सोयगाव वनविभागाकडून दक्षता

0
24

विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी

उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत डोंगराळ भाग व जंगलास आग लागू नये व नुकसान टळावे म्हणून सोयगाव वन विभाग सतर्क झाला आहे  सहाय्यक वनसंरक्षक सिल्लोड पुष्पा पवार,  सोयगाव वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल सपकाळ यांच्या  मार्गदशनाखाली  तसेच वनपाल गणेश सपकाळ यांच्या नेतृत्वखाली  वनरक्षक एस एस हिरेकर यांनी आपल्या सहकाऱ्यासह जरंडी,निंबायती, रामपूरा,बहुलखेडा शिवार परिसरातील डोंगराळ भागात आग लागू नये म्हणून ग्रस्त वाढवली आहे.

 

रात्री उशिरापर्यत डोंगराळ भागात रात्रीची ग्रस्ती वाढवली आहे तसेच परिसरातील शेतकऱ्यांना या बद्दल महिती देऊन सतर्क करण्यात येत आहे तसेच  वनविभागास सहकार्य करण्याचे आव्हान करण्यात येत आहे.

 

वनरक्षक एस एस हिरेकर , कर्मचारी गोविंदा गांगुर्डे,गणेश चौधरी, फैय्याज तडवी संतोष चव्हाण, छगन झाल्टे हे परिश्रम घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here