सोयगाव : प्रतिनिधी
छञपती संभाजी महाराज यांची जयंती व कविसंमेलनाचे आयोजन डाॕ.पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद , औरंगाबाद यांनी संभाजी चौक , होनाजी नगर , जटवाडा रोड , औरंगाबाद येथे केले .सुरुवातीला दीप प्रज्वलन करण्यात आले.मान्यवरांनी छञपती संभाजी राजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला .नंतर प्रा.डाॕ.ललित अधाने यांनी आपल्या स्वरचित कविता श्रोत्यांना ऐकविल्यात.नंतर मान्यवरांनी आपले मनोगत थोडक्यात व्यक्त केले .त्यानंतर मा.सुनिल चव्हाण साहेब ( जिल्हाधिकारी , औरंगाबाद ) यांचे शुभहस्ते श्री.आनंदा भगवान वारांगणे लिखित ‘ सार अभंगाचे ‘ , ‘ संतांचे शब्दामृत ‘ , ‘ लाणी ‘ या तीन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.याप्रसंगी मा.श्री.एल.जी.गायकवाड ( मा.उपाध्यक्ष जि.प.औरंगाबाद ) , मा.प्राचार्य डाॕ.आर.एस.पवार ( राज्य उपाध्यक्ष ,मराठा सेवा संघ),प्रा.डाॕ.ललित अधाने,प्रा.डाॕ.विष्णू सुराशे , जेष्ट पञकार अण्णा वैद्य ,एम.एम.खुटे सर व श्रोते उपस्थित होते.