चौकांमधील अपघात थांबविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

0
26

जळगावः प्रतिनिधी 

शहरात नव्याने बांधण्यात आलेल्या चौकांमधील सर्कलमुळे अपघात होत आहेत तसेच भविष्यात देखिल मोठ्या प्रमाणावर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर घटना थांबविण्यासाठी उपाययोजना करण्यातसाठी नगरसेवक सुनिल खडके यांनी नुकतेच जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले आहे.
शहरातील आकाशवाणी चौक, ईच्छादेवी व अजिंठा चौफुली येथे करण्यात आलेल्या सर्कल मुळे होत असलेले अपघात थांबविणे गरजेचे आहे. काल दुपारी अजिंठा चौफुली येथे जो अपघात झाला त्यात विनय खडके 52, यांचा सर्कलच्या चुकीच्या जागेमुळे मृत्यू झाला.लोक टर्न घेत असतांना बाजूने वाहन भरधाव वेगाने अंगावर येत आहे. यामुळे अपघात होत आहेत. यामुळे वाहतुकीत अडथळा निर्माण होवून ट्राफीक जाम होत आहे. भविष्यात असे अनेक अपघात होण्याची मोठ्या प्रमाणावर शक्यता आहे. त्यामुळे अनेक कुटूंब उध्वस्त होऊ शकतात यामुळे प्रत्येक सर्कल वर अंडर पुल होणे अत्यंत गरजेचे आहे. या गंभीर समस्येकडे लक्ष देवून समस्या सोडविण्यात याव्या असे सदर निवेदनात नमुद करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here