चोरटी वाळू वातुक करणारे डंपर जप्त ; भुसावळ तहसीलदारांची धडक कारवाई

0
11

साईमत भुसावळ प्रतिनिधी

भुसावळ येथील राष्ट्रीय महामार्ग क्र.6 वर वांजोळा रोड रस्त्यालगत राजस्थान मार्बल जवळ सापाळा रचत चोरटी वाळू वातुक करणारे डंपर ताब्यात घेत कारवाई केली आहे. सदरची कारवाई शुक्रवारी दि. ४ रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास तहसिलदार निता लबडे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.

याबाबत माहिती अशी की, तहसिलदार निता लबडे यांना जोगलखेडा परिसरात वाघुर नदीपात्रातून डंपरमध्ये वाळुची चोरटी वाहतुक केली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहिती वरून तहसिलदार निता लबडे यांच्या मार्गदर्शनात पहाटे ५ वाजेच्या सुमारास कुऱ्हे प्र.न.मंडळातील तलाठी, कोतवाल यांनी सापाळा रचला होता. राष्ट्रीय महामार्ग क्र.6 वर राजस्थान मार्बल जवळ डंपर (क्रमांक एमएच-18-सीएम-1584 ) थांबवुन तपासणी केली असता त्यात वाळु अढळुन आली. वाहन चालक यांचे कडे गौणखनिज वाहतुकीचा कोणताही परवाना अगर पावती नसल्याने सदर वाहन व वाहनातील गौणखनिजाचा पंचनामा करणेत आला.

सदर कार्यवाईत कुऱ्हे प्र.न. मंडळ अधिकारी योगीता पाटील, साकेगाव तलाठी मिंलीद तायडे, सुनसगाव तलाठी जयश्री पाटील, वराडसीम तलाठी नितीन केले, साकेगाव कोतवाल जितेश चौधरी यांचा सहभाग होता.
सदर वाहन दंडात्मक कार्यवाहीकरीता जप्त केले आहे. दरम्यान,तहसिलदार निता लबडे यांनी तहसिलदार पदाचा पदभार घेतल्यापासून महसुल पथकाने जवळपास 11 वाहनावर व पोलिस पथकांनी 2 वाहनावर कार्यवाही केली आहे. दरम्यान, यापुढे देखील अवैध गौणखनिज उत्खन्न व वाहतुक करणाऱ्या माफीयावर यापुढे देखील अशीचे कारवाई करणेत येईल तसेच महसुल पथकातील कर्मचारी यांचा पाठलाग करणे व शासकीय कार्यालय तसेच अधिकारी व कर्मचारी यांचे घरांच्या आजुबाजुस विनाकरण उभे राहुन रेकी करणे तसेच गौणखनिज विषयक माहिती पुरविणे अश्या इसमा विरुध्द एम.पी.डी.ए. अर्तंगत कठोर कारवाई करणेत येईल असा सज्जड इशारा गौणखनिज माफियांना व त्यांचे साथीदारांना तहसिलदारांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here