जळगाव ः प्रतिनिधी
चाळीसगाव येथे ॲड. सुभाष खैरनार यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी जळगाव जिल्हा वकील संघाकडून जाहीर निषेध करण्यात आला. जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. दिलीप बोरसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देण्यात आले.
ॲड. खैरनार यांना रुग्णालयात दाखल केले आहे. किसन सांगळे विरुद्ध पोलिसांत कलम 307 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी वकील संरक्षण कायदा त्वरित मंजूर करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. गुरुवारी अर्धा दिवस न्यायालय बंद ठेवून जाहीर निषेध करण्यात आला.
या प्रकरणाची कसून चौकशी व्हावी अशी मागणी ॲड. दिलीप बोरसे, ॲड.प्रभाकर पाटील, ॲड.शरद न्हायदेे, ॲड. प्रकाश पाटील, ॲड. भरत देशमुख, ॲड. दर्शन देशमुख, ॲड.केतन ढाके,ॲड.प्रवीण जंगले, ॲड. वैशाली बोरसे, ॲड. स्वाती निकम, ॲड. हर्षल राजपूत आदींनी निवेदन देताना केली.