चाळीसगाव महाविद्यालयात गुणवंतांचा सत्कार

0
117

साईमत लाईव्ह चाळीसगाव प्रतिनीधी

चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या बी.पी. आर्टस् , एस.एम.ए. सायन्स अँड के.के.सी.कॉमर्स कॉलेज आणि के. आर. कोतकर ज्युनिअर कॉलेज चाळीसगाव येथे बारावी बोर्डाच्या परीक्षेत यश संपादन करणाऱ्या गुणवंताचा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या मैनेजिंग बोर्डाचे चेअरमन  नारायणभाऊ अग्रवाल हे होते. याप्रसंगी संस्थेचे सचिव डॉ. विनोद कोतकर, ज्येष्ठ संचालक क. मा. राजपूत, अ‍ॅड. प्रदीप अहिरराव,  सुरेश स्वार, डॉ. सुनील राजपूत यांची उपस्थिती होती.
बारावी बोर्डाच्या परीक्षेत महाविद्यालयाच्या कला, वाणिज्य, विज्ञान आणि एम सी व्ही सी या शाखांमधून गुणांनुक्रमे प्रथम, द्वितीय,तृतीय आलेल्या गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार संस्थेच्या संचालकांच्या हस्ते करण्यात आला. कला शाखेतून  प्राची संभाजी पाटील (प्रथम 78.50%)  गायत्री रामेश्वर चौधरी (द्वितीय 78.17%) अनिरुद्ध भगवान मोरे (तृतीय 78.17%) तर विज्ञान शाखेतून  योगेश्वरी विजय जाधव (प्रथम 82.50%) अजिंक्य संजय चौधरी ( द्वितीय 77.00%)  कोमल अजय बाविस्कर (तृतीय 76.33%) वाणिज्य शाखेतून मंजिरी नंदकिशोर जाधव (प्रथम 91.50%)  अनुराधा सुनील राजपूत (द्वितीय 89%)  काजल चंद्रशेखर पाटील (तृतीय 88.17%) आणि MCVC विभागातून गौरव शरद यादव प्रथम, हर्षल सुधीर चव्हाण द्वितीय तर गिरीश भारत पाटील तृतीय यांनी यश संपादन केले.त्याबद्दल सर्व विध्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
यांचबरोबर महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनीही मिळविलेल्या कला, क्रीडा, साहित्य,संशोधन, विविध समित्या, अभ्यासमंडळे, पी. एच. डी. विविध पुरस्कार आदी यश निवडीबद्दल त्यांचेही कौतुक करण्यात आले.
अध्यक्षीय समारोप करताना नारायणभाऊ अग्रवाल यांनी सर्वांचे कौतुक केले व संस्था आणि महाविद्यालयाच्या नावालौकिकात अशीच भर घालावी असे आवाहन केले. त्याच बरोबर अधिकाधिक गुणवत्ता कशी मिळविता येईल यासाठी विशेष प्रयत्न करावेत असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. व्ही. बिल्दीकर यांनी केले.   सूत्रसंचालन प्रा. पूनम निकम व डॉ. मनीषा सूर्यवंशी यांनी केले तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य बी. आर. येवले यांनी केले . कार्यक्रमासाठी प्राद्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी ,  विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here