चाळीसगाव : प्रतिनिधी
शहरातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ६ प्रमुख रस्त्यांच्या दुरुस्ती कामाचे भूमिपूजन चाळीसगाव तालुक्याचे आ. मंगेश चव्हाण यांच्याहस्ते झाले. तसेच त्यांच्या आमदार स्थानिक विकास निधीतील इतर कामांचे देखील भूमिपूजन व लोकार्पण यावेळी करण्यात आले.
अनेकदा विकासकामांचे भूमिपूजन होते परंतु अनेक महिने कामांना प्रत्यक्षात सुरुवात देखील होत नाही, काही कामे तर वर्षानुवर्ष रखडल्याचे अनेक अनुभव नागरिकांना आलेले असतात. मात्र चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी आपल्या विकासकामांचा पॅटर्नच वेगळा निर्माण केला असून ज्यादिवशी रस्त्यांचे भूमिपूजन केले त्याच दिवशी शहरातील रस्त्यांचे काम युद्धपातळीवर सुरु देखील झाले. विकासकामांच्या “मंगेश पॅटर्न” ची चाळीसगावात जोरदार चर्चा असून शब्द देणारा व तात्काळ पाळणारा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी चाळीसगाव वासियांमध्ये विश्वास निर्माण केला आहे.
भूमिपूजन प्रसंगी भाजपा शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, जेष्ठ नेते विश्वास भाऊ चव्हाण, माजी गटनेते राजू अण्णा चौधरी, माजी गटनेते संजय रतनसिंग पाटील, माजी सभापती दिनेश भाऊ बोरसे, बाबूलाल पवार गुरुजी, माजी नगराध्यक्ष दिलीप चौधरी, माजी नगरसेवक नितीन पाटील, आनंद खरात, सोमसिंग राजपूत, निलेश महाराज राजपुत, प्रभाकर चौधरी, भास्कर पाटील, चिराग शेख, बापू अहिरे, मानसिंग राजपूत, चंद्रकांत तायडे, माजी नगरसेविका संगिताताई गवळी, विजयाताई प्रकाश पवार, विजयाताई भिकन पवार, रमेश सोनवणे सर, युवा मोर्चा भावेश कोठावदे, सामाजिक कार्यकर्ते सदानंद भाऊ चौधरी, जितुभाऊ वाघ, योगेश खंडेलवाल, डॉ.महेंद्र राठोड, दिलीप गवळी, कैलास नाना पाटील, मनोज गोसावी, जगदीश चव्हाण, प्रविण मराठे, किशोर रणधीर, स्वप्नील मोरे, साहेबराव राठोड, बबन पवार, अमोल चौधरी, किशोर गवळी, सुशील वानखेडे, संभाप्पा जाधव, राकेश बोरसे, रिजवाना शेख, आशिष गोयर, मयूर चौधरी, रणजित राजपूत, जितुभाऊ पाटील, सुनिल पवार, विकी देशमुख, इम्रान शेख, अग्गा भाई सय्यद, अकील मेंबर, दिनेश चौधरी, धर्मा बछे, सागर झोडगे, अजय वाणी, विजय जाधव, आदी उपस्थित होते.
सर्वाधिक रहदारी व वापर असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते हॉटेल दयानंद पर्यंतचा स्टेशन रोड दुरुस्तीसाठी देखील आमदार मंगेश चव्हाण यांनी आपल्या आमदार निधीतून ३० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून चाळीसगाव शहर वासीयांना त्रासदायक ठरणाऱ्या खराब रस्त्यांच्या प्रश्नावर नगरपालिका प्रशासन व संबंधित कंत्राटदार यांच्यात आमदार मंगेश चव्हाण यांनी पुढाकार घेत यशस्वी समन्वय घडवून आणत शहरातील ५ प्रमुख रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावला व त्याचे कार्यारंभ आदेश देखील तत्काळ मिळविले व प्रत्यक्षात कामांना देखील सुरुवात झाली असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.