चहापान कार्यक्रमावर बहिष्कार 

0
25

मुंबई प्रतिनिधी – यास्मिन शेख 

राज्य विधिमंडळाच्या उद्यापासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने भाजपा आणि मित्रपक्षांची बैठक आज मुंबई येथे झाली. त्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की ,

दाऊद इब्राहिम, अंडरवर्ल्डशी आर्थिक व्यवहार करणाऱ्या मंत्री नवाब मलिक यांना वाचवायला अख्खे सरकार उभे आहे.देशात असे कधी घडले नाही. ज्या सरकारचे प्रमुख शिवसेनेचे आहेत, ते मुंबईच्या खून्यांशी व्यवहार करणाऱ्या सोबत राहतात, हेही आम्ही आणि संपूर्ण महराष्ट्र पाहतो आहे.

राज्याच्या मंत्रिमंडळातुन नवाब मलिक यांची हकालपट्टी व्हावी यासाठी आम्ही या अधिवेशनात आक्रमक भूमिका घेऊ  . आणि तो घेतलाच पाहिजे ,तसे होणार नसेल तर हेच म्हणावे लागेल की हे दाऊद ला वाहिलेले सरकार आहे . राज्यतील जनतेचे प्रश्न सोडवण्यात हे सरकार पूर्णपणे फेल गेले आहे मात्र आम्हाला जनतेचे प्रश्न चर्चेच्या माध्यमातून सोडवण्यात रस आहे. त्यामुळे अनेक मुद्दे  सभागृहात मांडणार आणि चर्चा सुद्धा करणार.

त्यांनी  पुढे सांगितले की, राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे, पण तरी देखील त्याला आधार देण्या ऐवजी त्याची वीज कापली जाते आहे. अजित पवार यांनी दोन वेळा वीज न कापण्याबाबत शब्द दिला, पण त्यांचे कुणी ऐकत नाही. असे बोलून त्यांनी अजित पवारांना चिमटा काढला.

त्यांनी पुढे सांगितले  की राज्यातील शेतकऱ्यांना कोणती मदत नाही. ऊस गाळपासाठी जाणार नाही, अशी स्थिती आहे. कर्जमाफीतील अपूर्ण बाबी पूर्ण करून राहिलेल्या शेतकऱ्यांना मदत द्यायला लावणार असल्याचेही त्यांनी सांगितले

विविध समाजांचे प्रश्न आहेत. मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे , छत्रपतींना उपोषणाला बसायला बाध्य व्हावे लागले. आणि पुन्हा तीच आश्वासने सरकारने दिली. त्याबतोबरच सरकार मधील  भ्रष्टाचार चरमसीमेला पोहोचला आहे. लिपिक साहेबांना लाच मागतो अन् कंत्राटदारांकडून बचावासाठी काही अधिकारी बंदुकांची मागणी करतात, अशी भयावह स्थिती राज्यात आहे. असे ही त्यांनी यावेळी सांगितले . त्यामुळे या अर्थसंकल्पीय अधिवेशनात

या सर्व  प्रश्नावर सरकारला जाब विचारण्यासाठी विरोधी पक्षाने कंबर  कसली असून नवाब मलिक यांचा राजीम्यावर विरोधी पक्ष आक्रमक असणार आहे . नेहमी प्रमाणे विरोधकांनी या वेळी देखील अधिवेशनाच्या पूर्व संध्येला सरकार कडून होणाऱ्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकला असून उद्या पासून सुरु होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशन हे काय घडणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here