नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या लढाईमुळे तेल आणि गॅस उद्योगावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थितीमुळे भारतात कंपन्यांनी घरगुती वापराच्या एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत वाढ केली आहे. घरगुती वापराच्या १४.२ किलो वजनाच्या एलपीजी सिलेंडरची किंमत ३ रुपये ५० पैशांनी वाढली आहे.
दरवाढीमुळे दिल्लीत घरगुती वापराचा १४.२ किलो वजनाचा एलपीजी सिलेंडर १००३ रुपयांत उपलब्ध होईल. मुंबईत घरगुती वापराचा १४.२ किलो वजनाचा एलपीजी सिलेंडर १००२.५० रुपयांत उपलब्ध होईल. कोलकाता येथे घरगुती वापराचा १४.२ किलो वजनाचा एलपीजी सिलेंडर १०२९ रुपयांत उपलब्ध होईल. चेन्नईत घरगुती वापराचा १४.२ किलो वजनाचा एलपीजी सिलेंडर १०५८.५० रुपयांत उपलब्ध होईल.
याआधी ७ मे २०२२ रोजी घरगुती वापराच्या १४.२ किलो वजनाच्या एलपीजी सिलेंडरची किंमत ५० पैशांनी वाढविण्यात आली होती. तसेच २२ मार्च २०२२ रोजी सबसिडीच्या घरगुती वापराच्या १४.२ किलो वजनाच्या एलपीजी सिलेंडरची किंमत ५० पैशांनी वाढविण्यात आली होती.