विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी
सोयगाव : तालुक्यातील किन्ही गावातील पंचायत समिती मार्फत जाहीर झालेल्या नुकत्याच घरकुल यादीत वंचित गरजू ग्रामस्थांचे नावे वगळले असल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे, गावतील घरकुल साठी पाञ ठरलेले काही लाभार्थी धनदांडगे असुन त्यांचे पक्केघर तसेच बागायती जमीन असल्याचे निदर्शनास आले, माञ अपाञ ठरविण्यात आलेले वंचित गरजू गरीब यांच्या वर अन्याय होऊ नये यासाठी स्वप्नपूर्ती फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष समाधान शिंदे पाटील यांनी थेट औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालय गाठत चौकशी करण्यात यावी ही मागणी केली आहे.
तसेच यात संबंधित कर्मचारी वर कारवाई करण्यात यावी असे देखील अर्ज देण्यात आला, सदरील पाञ अपाञ यादीची चौकशी जलद गतीने व्हावी अशी मागणी औरंगाबाद जिल्हाचे खासदार इम्तियाज जलील यांच्या कडे करण्यात आली असुन लवकरच या सर्व यादीची चौकशी करण्यात येणार असल्याचे समाधान शिंदे पाटील यांनी सांगितले.पुढील काही दिवसात विस्तार अधिकारी तथा गटविकास अधिकारी प्रत्यक्ष पाहणी न केल्यास सोयगाव पंचायत समिती व तहसिल कार्यालय येथे साखळी उपोषण करण्याचा इशारा दिला आहे….जोपर्यत प्रत्यक्ष पाहणी होत नाही तोपर्यंत घरकुलांना स्थगिती देण्यात यावी हे देखील नमुद केले आहे. गावातील ग्रामस्थांनी सोयगाव पंचायत समिती येथे यासंदर्भात निवेदन सादर केले असुन यावर अनेक ग्रामस्थांच्या सह्या आहे व स्वप्नपूर्ती फाउंडेशन चे पदाधिकारी व सदस्यांनी औरंगाबाद येथे जिल्हाधिकारी कार्यालय वर जाऊन सदरील निवेदन सादर केले.