घनकचरा प्रकल्प बीओटी तत्त्वावर उभारावा

0
79

जळगाव ः प्रतिनिधी
शहरासह आजूबाजूच्या ग्रामीण भागातील जिड लाख लोकांच्या आरोग्याशी संबंधित घनकचरा प्रकल्पाचे काम रखडले आहे. मक्तेदार काम करण्यास तयार नसेल तर मनपाने बीओटी तत्त्वावर प्रकल्प उभारावा, अशी मागणी माजी उपमहापौर डॉ. अश्‍विन सोनवणे यांनी केली आहे.

आव्हाणे शिवारात मनपाच्या जागेवर घनकचरा प्रकल्पाचे काम नियोजित आहे. सध्या या प्रकल्पाच्या जागेवर सात वर्षांपासून कचरा साठवला जात आहे. मनपा व सत्ताधाऱ्यांनी जनतेच्या आरोग्याशी खेळू नये.घनकचरा प्रकल्प बीओटी तत्त्वावर उभारावा. त्यामुळे मनपाच्या 48 कोटींच्या निधीची बचत होईल.तो निधी शहरातील विकास कामांसाठी खर्च करणे शक्य होईल,या मागणीचे निवेदन माजी उपमहापौर डॉ. सोनवणे यांनी आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांना दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here