ग.स.निवडणुकीसाठी 28 एप्रिल रोजी मतदान

0
29

जळगाव ः प्रतिनिधी
जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी 28 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तालुकानिहाय मतदान केंद्र निश्चित करण्यात आले असून, सहकार विभागातर्फे इलेक्शन ड्यूटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.

ग.स. सोसायटीसाठी गुरुवारी मतदान होणार आहे. मतदान केंद्राध्यक्ष मतदान, अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण वर्ग सोमवारी पार पडला. जिल्हा उपनिबंधक, जिल्हा विशेष लेखापरीक्षक, जिल्ह्यातील सर्व तालुका सहायक निबंधक कार्यालये, जिल्ह्यातील सर्व तालुका लेखापरीक्षक कार्यालये, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्या, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, जळगाव जनता बँक, जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या या आस्थापनांवरील अधिकारी-कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. संस्थेचे निवडणूक निर्णय अधिकारी संतोष बिडवई यांनी प्रशिक्षण वर्गात मार्गदर्शन केले.

प्रशिक्षणात अधिकाऱ्यांनी सर्व मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रक्रिया पारदर्शी व कायदेशीररीत्या पार पाडण्याबाबत सूचना देण्यात आल्या. मतदान प्रक्रियेत सर्व संबंधिताना सोपवलेल्या कामकाजाचे नियोजन या प्रशिक्षण वर्गात सांगण्यात आले. तसेच कर्मचाऱ्याच्या विविध शंकांचे निरसन अधिकाऱ्यांनी मार्गदर्शनातून केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here